Kellogg’s Chocos मध्ये सापडल्या अळ्या, व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनी म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Worms found in Kellogg’s: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी या व्हिडिओमुळं समाजात काय चाललंय याचीही माहिती मिळते. असाच एक मन विचलित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक आवडीने केलॉग्स चॉकोस (Kellogg’s Chocos) खातात. याच केलॉग्समध्ये अळ्या सापडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होतोय. 

सोशल मीडिया युजर @cummentwala_69 वर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत युजरने केलॉग्सच्या एका तुकड्यावर कॅमेऱ्याचा फोकस ठेवला आहे. यात तो व्हिडिओत बोलताना दिसत आहे की, चॉकोस एक्स्ट्रा प्रोटीनची गरज भरुन काढण्यासाठी असा वापर करत आहेत का?. तसंच, चॉकोसचा तुकडा तोडन असताना त्यात सफेद रंगाची अळीदेखील दिसत आहे. हा व्हिडिओपाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. 

व्हिडिओतील तरुण एकापाठोपाठ एक केलॉग्स चॉकोस तोडताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे त्यातील प्रत्येक चॉकोसमध्ये पांढऱ्या अळी सापडल्या आहेत. तसंच, व्हिडिओ जस जसा पुढे जातोय तस एका ताटात चॉकोसचा चुरा पडलेला दिसत आहे. यातही काही अळ्या दिसत आहेत. हा सर्व प्रकार पाहून अनेकांना किळसवाणा वाटला आहे. 

धक्कादायक म्हणजे, केलॉग्स चॉकोसच्या पाकिटावर त्याची एक्सपायरी डेट ही मार्च 2024 आहे. अजून वस्तू खराब होण्याचा कालावधी दोन महिने आहेत. त्या आधीच त्यातून अळ्या निघत असल्याने नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यानंतर कंपनीनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे की, तुझ्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खूप दुखः होतंय. या प्रकरणाची पडताळणीसाठी आमची कन्झुंमर अफेअर टीम तुमच्याशी संपर्क साधेल. तुमच्या सर्व तपशील आम्हाला पाठवा. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत आमच्यासोबतही असाच प्रसंग घडल्याचे सांगितले आहे. एकाने म्हटलं आहे की, काही वर्षांपूर्वी मलादेखील अशाच प्रकारचा अनुभव आला होता. मला केलॉग्समध्ये जिवंत अळी सापडली होती. मात्र, तेव्हा सोशल मीडिया इतका प्रगत नव्हता त्यामुळं मला हे मांडता आले नाही. त्या दिवसापासून मी चॉकोस खाणे सोडले आहे. अजूनही असंच घडत आहे यावर माझा विश्वास बसत नाही, असं एका व्यक्तीने म्हटलं आहे. 

Related posts