Ashok Chavan join BJP big changes in Nanded district politics BJP political strength increase in Lok Sabha election Assembly Election marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nanded Politics : अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) भाजप (BJP) प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. मात्र, यासोबतच अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ आणि त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या राजकारणात देखील मोठे बदल होणार आहेत. कारण चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असून, चव्हाण यांच्या रूपाने ते आता भाजपच्या पारड्यात पडणार आहे. मग विधानसभा मतदारसंघ असो, किंवा महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. त्यांना यावेळी 4 लाख 86 हजार 806 मते मिळाली होती. मात्र, याचवेळी अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार 658 मते मिळाली होती आणि 40 हजार 138 मतांनी ते पराभूत झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना 1 लाख 66 हजार 196 मते मिळाले होते, परिणामी काँग्रेसच्या अशोक चव्हाणांच्या पराभव झाला होता. त्यामुळे आता अशोक चव्हाण चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अशीच परिस्थिती स्थानिक निवडणुकीत देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

नांदेड जिल्ह्याची संभाव्य स्थिती

  • 1 जिल्हा परिषद नांदेड
  • 16 पंचायत समिती
  • 15 नगर परिषद
  • 1 महापालिका
  • 9 विधानसभा
  • 1 विधान परिषद

सध्याचे पक्षीय बलाबल नांदेड जिल्हा (विधानसभा)

  • नांदेड दक्षिण – काँग्रेस
  • नांदेड उत्तर – सेना शिंदे गट
  • कीनवट – भाजप
  • हदगाव – काँग्रेस
  • भोकर – भाजप
  • नायगाव – भाजप
  • मुखेड – भाजप
  • देगलुर – काँगेस
  • लोहा – शेकाप

भाजपची राजकीय ताकद वाढणार…

नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यातील 4 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. तर,  3 मतदारसंघ काँगेसच्या ताब्यात आहे. अशात अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशानंतर काँगेसचे किती आमदार त्यांच्यासोबत जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपला नांदेड जिल्ह्यात मोठा फायदा होणार आहे. तसेच त्यांच्या विधानसभेच्या जागा देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होणार यात कोणतेही शंका नाही. 

मराठवाड्यात देखील परिणाम पाहायला मिळणार…

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे फक्त नांदेड जिल्ह्याच्याच नव्हे तर मराठवाड्यातील राजकारणात देखील मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण अनेक आजी-माजी आमदार हे चव्हाण यांचे खंदे समर्थक असल्याचे समजले जातात. त्यामुळे चव्हाण यांच्या पाठोपाठ हे नेतेमंडळी सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Rajya Sabha Election 2024: भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार; अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसची अडचण, समीकरण काय?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts