‘एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला, हा भाजपालाच धक्का, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray : आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये (BJP) आला.  हा भाजपलाच धक्का आहे. काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. शिवसेनेलाही (Shivsena) धक्का बसला नाही, अशा प्रकारचे धक्के आम्ही अनेक पचवले आहेत. सडलेले पानं झडली गेली आणि नवी कोंब फुटतात. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि खासदारकी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीपद द्यायचे हीच मोदी गॅरंटी आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. श्रीरामपूर येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.  

उद्धव ठाकरे म्हणाले की, अवकाळीचा फटका बसला. अवकाळीचा फटका बसला. दुष्काळात अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी ते मोदींच्या दारात गेले. मोदी 10 वर्षांपासून स्वप्न बघत आहेत. मोदी 3 तास झोपतात. त्यांना स्वप्न पडतात कधी? तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची भाजपची ताकद नाही का? नालायक लोक आहेत. तुम्हाला दुसरे पक्ष का फोडावे लागतात? माझी शिवसेना फोडली, नितीश कुमार, अशोक चव्हाण फोडले, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

दिल्लीच्या वेशीवर धुमशान चालू आहे. आपल्या, दिल्लीच्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. ज्यांच्या जोरावर मोदी पंतप्रधान झाले, त्यांच्या घरी जातात मग ते शेतकरी तुमच्या घरी आलेत तर चालत नाही का?  पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैनिक पाहिजे.  ते दिल्लीत आहेत, त्यांचे आई वडील हे शेतकरी आहेत. त्यांना रोखतात, मोठी भिंत लावतात. खिळे टाकतात. ज्या मातीत सोनं उगवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी सरकारला गाडले पाहिजे, अशी टीका त्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पंतप्रधान मोदींवर केली आहे.  

फडणवीस-शिंदेंवरही टीकास्त्र

फडणवीस यांना काय बोलावे फरक पडत नाही. फडतूस बोललो, नालायक बोललो, काही फरक पडत नाही. निर्लज्जम सदादुखी आहेत. पाव मुख्यमंत्री आहे तरीही काही वाटत नाही. मिंध्याला मुख्यमंत्री बनवले, जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे ते विचार करत असतील कोणासाठी काम करतोय या उपऱ्यासाठी का? अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. 

जनतेसाठी मैदानात उतरलोय

मोदी सारखे महाराष्ट्रात येत आहेत. 19 तारखेला शिवनेरीवर येताय असे ऐकतो आहोत. कोस्टल रोडचे माझे स्वप्न होते, कोणीतरी उद्घाटन करतंय, आम्ही जळणारे नाही. पंतप्रधान उद्घाटन करत आहेत याचा अभिमान आहे. मुंबईमधील डायमंड मार्केट गुजरात, फिल्मफेअर गुजरातला मी मनकी बात नाही, जन की बात करण्यासाठी आलोय. पंतप्रधान येऊन काही बोलले तरी तुम्ही भुलणार नाही. जे भेकड, घाबरट असतील त्यांनी इथुन निघून जा. भाकड जनता पार्टीत जा. मी तुमच्यासाठी नाही जनतेसाठी मैदानात उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

आणखी वाचा 

Sanjay Raut : सर्व भ्रष्ट लोक घ्यायचे, तुमचा पक्ष कुठय? भाजपची भ्रष्ट काँग्रेस झाली; संजय राऊतांचा हल्लाबोल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts