India Can Create History In WTC Final 2023 ; भारताला पाचव्या दिवशी इतिहास रचण्याची संधी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : चौथ्या दिवशी भारतीय संघाने दमदार खेळ केला आणि त्यामुळे आता हा सामान दोलायमान अवस्थेत आहे. हा सामना आता पाचव्या दिवशी पोहोचला आहे. आता या पाचव्या दिवशी भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. कारण आतापर्यंत जे कोमत्याही देशाला करता आलेले नाही ते भारतीय संघाला करता येऊ शकते. त्यामुळे आता संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष भारतीय संघाकडे लागलेले आहे.या कसोटीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा होता. पण तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेने भारताला सावरले. अजिंक्य आणि शार्दुल ठाकूर यांनी भारताला फॉलोऑनपासून वाचवले. चौथ्या दिवशीही भारताने दमदार फलंदाजी करत विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. त्यामुळे आता हा सामना पाचव्या दिवशी चांगलाच रंजकदार होणार आहे. पण या पाचव्या दिवशीच भारतीय संघाला आता इतिहास रचण्याची संधी आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात फलंदाजी करणे सोपे नसते, पण क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी ४४४ धावांचे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवशी भारताने ३ बाद १६४ अशी मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी आता पाचव्या दिवशी २८० धावांची गरज आहे. भारताने जर या २८० धावा केल्या तर इतिहास रचला जाईल. कारण आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एवढी मोठी धावसंख्या उभारत कोणत्याही संघाने विजय साकारलेला नाही. आतापर्यंत चौथ्या डावात सर्वाधिक धावा करून विजय मिळवण्याचा मान वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजच्या संघाने ऑस्ट्रेलियाला २००३ साली ४१८ धावा करत पराभूत केले होते. त्यामुळे आता भारताने जर ४४४ धावा केल्या तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करणाऱ्या देशांच्या यादीत भारतीय संघ अव्वल स्थानावर दाखल होईल आणि त्यांच्या नावावर इतिहास लिहिला जाईल. त्यामुळे आता या पाचव्या दिवशी भारतीय संघ विजय मिळवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

भारताने पाचव्या दिवशी जर २८० धावा केल्या तर त्याच्या नावावर इतिहास लिहिला जाणार आहे.

[ad_2]

Related posts