maharashtra politica News MP Amol Kolhe reaction On sharad pawar faction may merge into congress

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : शरद पवार गट (Sharad Pawar) हा काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु असाताच आणि त्यानंतर  पक्षाच्या चिन्हाची चर्चा सुरु असताना खासदार अमोल कोल्हे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह लवकरच सगळ्यांसमोर आणू त्यासोबतच भाजपमध्ये सध्या भीतीचं वातावरण असल्याचं खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी आणि राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर अमोल कोल्हे माध्यामांशी बोलत होते.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबत कोणताही चर्चा झालेली नाही, असं बैठकीत सहभागी असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. अमोल कोल्हे म्हणाले की, शरद पवार गटातील पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही लवकरच जनतेपर्यंत आम्ही पोहचवू. त्यासोबतच  या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबत कोणताही चर्चा झालेली नाही अशी  अमोल कोल्हे यांनी दिली आहे. 

शरद पवारांचा दरारा कायम

शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार याच्या चर्चा शरद पवार गटाने फेटाळून लावल्या आहेत. यासंदर्भात बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की,  विलिनीकरणाच्या बातम्या का पेरल्या जातात? हे आम्हाला माहित नाही. जर या बातम्या पेरल्या जात आहेत म्हणजेच शरद पवारांचा दरारा आणि जनमानसातली त्यांच्या संदर्भात असलेली प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

भाजपमध्ये भीतीचं वातावरण

 ते म्हणाले की, आजच्या बैठकीत महाविकास आघाडी आणि एनडीए आघाडी म्हणून ठामपणे सामोरं जायचं आहे, यासंदर्भात चर्चा झाली. त्याच बरोबर सत्ताधारी पक्षात जे भीतीचं वातावरण आहे. एकीकडे 400 पार सांगितलं जात आहे तरीही बिहार आणि झारखंडमध्ये जे घडलं आणि त्यानंतर नुकतंच महाराष्ट्रात जे घडलं हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. आब की बार 400 पार असतं तर पक्ष फोडण्याची, काही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची आणि पक्ष पळवण्याची  भाजपला गरज का पडली असली?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

आम्ही साहेबांच्याच नेतृत्त्वाखाली निवडणूक लढणार, शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा फेटाळली

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts