Special Report BJP Rajyasabha Election 2024 Maharashtra Politics Devendra Fadnvis abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Special Report BJP  : भाजपनं कसा साधला समतोल , भाजपचे 3 उमेदवार, समतोलाचं द्वार
राज्यसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये दाखल झाले, त्याला २४ तासही झालेले नव्हते. आणि भाजपनं त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही संधी देऊन भाजपनं आपण निष्ठावंतांना विसरत नसल्याचा संदेश दिला. नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपनं विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिर आंदोलनातल्या कार्यकर्त्याला मुख्य प्रवाहात सामावून घेत असल्यातं दाखवून दिलं. या तिघांना उमेदवारी देताना भाजपनं सामाजिक आणि जातीय समीकरण साधण्याचाही प्रयत्न केला. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात भाजपनं राज्यसभेच्या मैदानातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतांची बेगमी कशी केलीय? याबाबतचा सविस्तर रिपोर्ट पाहूयात.

[ad_2]

Related posts