Xiaomi Redmi A3 Smartphone price in india launch know camera specifications and more details marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Xiaomi Redmi A3 Smartphone : आपल्यापैकी सर्वांनाच विशेषत: बजेट फ्रेंडली स्मार्टफोनचं खास आकर्षण असतं. कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त चांगले फिचर्स असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. याचसाठी अनेक कंपन्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च करत असतात. नुकताच Xiaomi ने देखील असाच बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Redmi A3 असं या स्मार्टफोनचं नाव असून तो भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत दहा हजारांहूनही कमी आहे. जे पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणार आहेत अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन आहे. 

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 90Hz चा रिफ्रेश रेट असणारी स्क्रिनदेखील मिळणार आहे. तसेच, डिव्हाईस हॉलो डिझाईनसह असून यामध्ये सर्क्युलर कॅमेरा आणि लेदर टेक्च्र बॅक पॅनल उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने दमदार बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी कोणत्या खास गोष्टी आहेत ते जाणून घेऊयात. 

Redmi A3 ची किंमत किती?

Xiaomi Redmi A3 या स्मार्टफोनला कंपनीने तीन वेगवेगळ्या कॉन्फिग्रेशनमध्ये लॉन्च केलं आहे. तसेच, या स्रमार्टफोनची सुरुवातीची किंमत 7,299 रूपयांपासून सुरु होते. यामध्ये ग्राहकांना 3GB RAM +64GB स्टोरेज व्हेरिएंट देण्यात आला आहे. तर, 4GB RAM +128GB स्टोरेजची किंमत 8,299 रूपये आहे. आणि 6GB RAM +128GB व्हेरिएंटची किंमत 9,299 रूपये इतकी आहे. 

जर तुम्हाला हा स्मार्टफोनची खरेदी करायची असेल तर तुम्ही Flipkart-Amazon आणि mi.com वर खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 23 फेब्रुवारीला सेल होणार आहे. यामध्ये 300 रूपयांचा एक्सचेंज बोनसदेखील देण्यात आला आहे. यानंतर या हॅंडसेटची किंमत 6,999 रूपये आहे. तुम्ही या स्मार्टफोनबरोबर Redmi watch 2 Lite ला 1499 रूपयांमध्ये खरेदी करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ इअरबड्समध्ये Galaxy AI फीचर्सही आहेत; यूजर्सना नेमके कोणते फायदे मिळतील?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts