technology news Instagram Scam how to stay safe from hackers while using instagram app know tips and tricks marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Instagram Scam : सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) काळात ऑनलाईन स्कॅम (Online Scam) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घोटाळे करणारे लोक फसवणुकीचे नवीन मार्ग शोधण्याच्या तयारीत आहेत. आता तर, घोटाळे करणारे लोक ज्या माध्यमांचा सर्वात जास्त वापर करतात अशा अॅप्सचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतायत. सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर आता एक नवीन स्कॅमची सुरुवात झाली आहे. या माध्यम घोटाळे करणारे लोक हे यूजर्सचं अकाऊंट हॅक करतायत. जर या घोटाळे करणाऱ्यांपासून तुम्हाला तुमचं अकाऊंट हॅक होण्यापासून वाचवायचं असेल तर यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. 

इन्स्टाग्रामवर जे लोक कंटेट पोस्ट करतात अशाच लोकांना स्कॅम करणारे लोक आपलं टार्गेट बनविण्यास सुरुवात करतायत. घोटाळे करणारे लोक हे इन्स्टाग्रामवरून मेसेज आल्याप्रमाणे यूजर्सना मेसेज पाठवतात. या मॅसेजमध्ये असं लिहिलं असतं की, आम्हाला आपल्या अकाऊंटवर असा कंटेट मिळाला आहे जो आमच्या कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन करणारा आहे. यामुळे तुमचं अकाऊंट 24 तासांत बंद होईल. 

जर तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडून काही चूक झाली आहे तर तुम्ही Copyright Objection Form भरू शकता. या फॉर्मला भरण्यासाठी तुम्हाला एक लिंक पाठवली जाते. ज्या यूजर्सचा इन्स्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स आहेत तसेच त्यांचा रिच जास्त आहे. ते या मेसेजला पाहून नक्कीच घाबरू शकतात. लोकांच्या याच भीतीचा घोटाळा करणारे लोक फायदे उचलतात. आणि यूजरने कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास ते त्यांचं अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते. 

स्कॅमपासून वाचण्यासाठी काय करू शकता? 

क्लिक करू नका : इन्स्टाग्रामवर आलेल्या कोणत्याही लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नका. 

डिटेल्स शेअर करू नका : इन्स्टाग्राम यूजर नेम, पासवर्ड, आयडी या संबंधित कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका. 

अधिकृत वेबसाईटचा वापर करा : जर तुम्ही ब्राऊजरच्या माध्यमातून इन्स्टाग्रामचा वापर करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की घोटाळा करणारे लोक फेक लॉग इन अकाऊंटसुद्धा सुरु करू शकतात. लिंक ओपन केल्यानंतर यूआरएल नक्की चेक करा. 

स्ट्रॉंग पासवर्ड सेट करा : अकाऊंटला सुरक्षित ठेवण्यासाठी एखादा स्ट्रॉंग पासवर्ड सेट करणं गरजेचं आहे. ज्यामध्ये कमीत कमी 8 लेटर्स, 1 मोठं लेटर, 1 छोटं लेटर, 1 संख्या आणि 1 विशेष लेटर असणं गरजेचं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

iPhone 16 चे फीचर्स लीक, iPhone 12 चे युजर्स खूश, नेमकी भानगड काय? वाचा सविस्तर

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts