Praful Patel Net Worth almost 500 crores more than 9 times by former cm ashok chavan milind deora Medha Kulkarni Chandrakant Handore

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Praful Patel Net Worth : अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya sabha Election 2024) राजीनामा द्यायला लावून प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटात तब्बल 10 जण राज्यसभेसाठी इच्छूक होते, पण लोकसभेच्या तोंडावर वादाला वळण नको म्हणून राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे, भाजपकडून अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या (Rajya Sabha Election Maharashtra) सहा जागांची निवडणूक होत असून निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

प्रफुल पटेल 500 कोटींच्या घरातील संपत्तीचे मालक Praful Patel Net Worth

अजित पवार गटातील प्रफुल पटेल सध्या राज्यसभेवर आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार असतानाही राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरण्यात आला. कार्यकाळ संपण्याच्या तब्बल 3 वर्ष आधी हा निर्णय का घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे प्रफुल पटेलांकडून निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या संपत्तीने सुद्धा भूवया उंचावल्या आहेत. प्रफुल पटेल तब्बल 500 कोटींच्या घरातील संपत्तीचे मालक आहेत. 

अशोक चव्हाणांच्या तब्बल नऊपट अन् इतर 3 उमेदवार खिजगणतीतही नाहीत!  Praful Patel Net Worth

राज्यसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात असून यापैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  प्रफुल पटेल कोट्यधीश उमेदवार आहेत. पत्नी आणि त्यांच्या नावे स्थावर आणि जंगम मालमत्ता तब्बल 483 कोटींच्या घरात आहे. यामध्ये पत्नी वर्षा तसेच हिंदू संयुक्त कुटुंब पद्धतीच्या मालमत्तेचा आणि वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचा समावेश आहे. पटेल यांची जंगम मालमत्ता 179 कोटी तर स्थावर मालमत्ता 104 कोटी रुपये आहे. या व्यतिरिक्त शेअर मधील गुंतवणूक आहे. त्यांच्या पत्नीवर 46 कोटींचं कर्ज आहे. 

दुसरीकडे, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये जंगम मालमत्ता 16 कोटी तर स्थावर मालमत्ता 51 कोटी 65 लाख रुपयांची आहे. कर्ज पाच कोटी रुपये आहे.

मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्याकडे 114 कोटींची मालमत्ता असून स्थावर मालमत्ता 23 कोटी आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. 

मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये जंगम मालमत्ता 2 कोटी 43 लाख रुपयांची असून स्थावर मालमत्ता दोन कोटी 48 लाख रुपयांची आहे, तर कर्ज 54 लाख रुपये आहे. 

डॉक्टर अजित गोपछडे (Ajit Gopchade) यांची जंगम मालमत्ता 3 कोटी 41 लाख आहे. स्थावर मालमत्ता 1 कोटी 88 लाख रुपयांची आहे. त्यांच्यावर चार कोटी रुपयांचं कर्ज आहे.

चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) हे तुलनेत सर्वात गरीब उमेदवार असून त्यांच्याकडे 86 लाख 72 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर स्थावर मालमत्ता एक कोटी 68 लाख इतकी आहे. त्यांच्यावर 54 लाख रुपये कर्ज आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

  • Shivsena Maha Adhiveshan : शिवसेनेच्या महा अधिवेशनात पीएम मोदी आणि अमित शाहांच्या कौतुकासह सहा ठराव

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts