Chiplun BJP leader nitesh rane and Shiv Sena UBT leader bhaskar jadhav Clashes political leaders reaction

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chiplun BJP Shiv Sena UBT Clashes : चिपळुणमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, राजकीय वर्तुळात घमासान

चिपळूण, रत्नागिरी : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane Guhagar) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला. त्यावेळी ही दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये (Nilesh Rane Guhagar Sabha) जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपळूणमद्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले.  या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. 

निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या (Bhaskar Jadhav) गुहागर (Guhagar) मतदारसंघात तळी (Tali) येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली. भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये आज सभेचं आयोजन केलं आहे. 

[ad_2]

Related posts