Baramati Lok Sabha constituency sunetra pawar vs supriya sule lok sabha election marathi news update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sunetra Pawar Vs Supriya Sule : बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रुजलेले समीकरण आहे. पण काकांची साथ सोडून अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची साथ धरल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या विरोधात कोण लढणार? असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावर चर्चा रंगू लागली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लढणार असल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्याला बळ सुनील तटकरे यांच्या वक्तव्यानं आणखी मिळाले आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या विकासकामाचा रथ बारमती मतदारसंघातून फिरत आहे. अजित पवार यांनीही शुक्रवारी आम्ही दिला तो खासदार निवडणून द्या, अशी भावनिक साद दिली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार, हे जवळपास निश्चित मानले जातेय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेठी घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळेही  पायाला भिंगरी बांधल्यासारखं मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये नणंद भावजय असा मुकाबला होणार हे जवळपास निश्चित झालेय. 

सुनेत्रा पवारांनी लोकसभा लढवावी अशी बारामती मतदारसंघातील अनेकांची इच्छा आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. त्यानंतर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार या चर्चेला बळ मिळाले. पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार हे समीकरण गेली 5 दशकं राज्यात रुजले आहे. काकांची साथ सोडून अजित पवार भाजपसोबत गेले आणि तेव्हापासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरते आहे.यातच आज बारामती शहरात सुनेत्रा पवारांचा कार्याचा विकास रथ फिरवला जात आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार का अशी चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. 

पवार विरुद्ध पवार –

सुळे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  कोण असणार याची चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याचे चर्चा जोर धरत असतानाच रोहित पवारांनी देखील अजित पवारांच्या कुटुंबातीलच उमेदवार असू शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे बारमातीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगेल, अशीच शक्यता वर्तवण्यात येतेय. 

कोण आहेत सुनेत्रा पवार? 

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्या मुळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील असून पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. सुनेत्रा पवार या एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य आहेत. विद्या प्रतिष्ठान संस्थेवर विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवारांचा पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे.

 अजित पवारांची भावनिक साद – 

गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. गुरुवारी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच हळदी कुंकूच्या माध्यमातून महिलांना भेटत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशी चर्चा जोर धरते आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवाराचे स्वागत केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी मी उमेदवार आहे असं समजून मतदान करा असे सांगितले आहे. त्यामुळे उमेदवार कोण असणार अशी चर्चा रंगू लागली असताना सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा जोरदार आहे.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts