technology news how to keep your kids safe when using phone use safety internet dangers always on these settings marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Make Mobile Safe for Kids : सध्याच्या काळात मोबाईलचा (Mobile) वापर इतका सर्रास होत चालला आहे की, लहान मुलंही मोकळ्या वेळेत खेळ खेळण्याऐवजी स्मार्टफोन (Smartphone), टॅब्लेट आणि लॅपटॉप यांसारख्या गॅजेट्सवर वेळ घालवतात. लहान मुलाच्या हातात सतत गॅजेट्स राहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर आणि शरीरावरही परिणाम होतो. तसेच, मानसिक ताणही वाढतो. अनेक वेळा गॅजेट्समुळे इंटरनेटशी संबंधित धोका असतो. आज मुलांच्या हातात मोबाईल आल्याने इंटरनेटवर अश्लिल व्हिडीओ पाहणं फार सोपं झालं आहे. यामुळे मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका देखील वाढण्याचं प्रमाणही वाढलं आहे. 

अनेकदा पालकांचा विरोध असतानाही मुलं अगदी सहजपणे फोन हाताळतात आणि वेगवेगळ्या साईट्सवर सहज जातात. अशा वेळी मुलांसाठी इंटरनेट किंवा फोन सुरक्षित करण्यासाठी पालकांना काही पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे.  

सेटिंग्जमधून अॅडल्ट कंटेंट नियंत्रित करा

तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल येताच त्याचा जर दुरुपयोग होऊ नये तसेच अॅडल्ट कंटेंट मुलांनी पाहू नये असं जर तुम्हाला वाटत असेलत तर सर्वात आधी तुम्हाला Android वर Google Play निर्बंध चालू करावे लागतील. हे मुलाला त्यांच्या वयासाठी योग्य नाहीत अशा ॲप्स, गेम्स आणि इतर वेबसाईट्स डाऊनलोड करण्यापासून प्रतिबंधित करेल. यासाठी सर्वात आधी मुलांच्या डिव्हाईसवरील Google Play Store वर जा. त्यानंतर डाव्या कोपऱ्यात असलेल्या सेटिंग्जवर जा. यानंतर तुम्हाला ‘Parental controls’ चा ऑप्शन दिसेल.

त्यावर टॅप केल्यावर तुम्हाला पिन सेट करण्यास सांगितले जाईल. पिन सेट करून पालक कंट्रोल सेटिंग्ज बदलू शकतात. एकदा पिन सेट केल्यानंतर, तुम्ही प्रत्येक रेंजसाठी स्टोअर-आधारित वय निर्बंध सेट करू शकता. पालकांनी हा पिन फक्त मुलाला सांगू नये.  

सोशल मीडिया सेटिंग्ज

YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पालक कंट्रोल ऑप्शन देखील उपलब्ध आहे. तुम्ही सोशल मीडिया ॲप्सवर पॅरेंटल कंट्रोल सुरू केल्यास, तुम्ही मुलांच्या ॲक्टिव्हिटींचा सहज मागोवा घेऊ शकता आणि त्यांना चुकीच्या गोष्टी पाहण्यापासून थांबवू शकता.

एक वेगळा ईमेल आयडी आवश्यक

अनेक वेळा, सोयीसाठी, पालक त्यांच्या मुलांना स्वतःचा ईमेल आयडी वापरून सर्व ॲप्स चालवण्याची परवानगी देतात. पण, मुलांसाठी वैयक्तिक ई-मेल आयडी तयार करणे ही अधिक सुरक्षित पद्धत आहे. याद्वारे, पालक आपल्या मुलांना केवळ चुकीच्या जाहिरातींपासून दूर ठेवू शकत नाहीत तर त्यांच्या मुलांच्या इंटरनेट हालचालींचा सहज मागोवा घेऊ शकतात.

मुलांसाठी इंटरनेट सेफ्टी टिप्स :

जर तुम्ही तुमच्या मुलाला फोन दिला तर त्याला इंटरनेट सेफ्टीबद्दल सांगत रहा. मुलांना व्हायरस, मालवेअर, सायबर गुन्हे आणि ऑनलाईन पेमेंटशी संबंधित फसवणूक याबद्दल जागरूक करा आणि फसवणूक कशी ओळखावी हे देखील शिकवा.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts