Virendra Sehwag on Yashasvi Jaiswal says Treating spinners the way they should be treated

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virendra Sehwag on Yashasvi Jaiswal : भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. राजकोट कसोटीत यशस्वी जैस्वालने अवघ्या 122 चेंडूत शतक झळकावले. यशस्वी जैस्वालचे कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. तो शतकी खेळी केल्यानंतर रिटायर हर्ट झाला. यशस्वीने 9 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. 

सेहवागने मीठ चोळले!

कसोटी पर्दापणानंतर वेगाने तीन शतके करण्याचा पराक्रम यशस्वीने केला आहे. त्याने सेहवाग आणि संजय मांजरेकर यांना मागे टाकत हा पराक्रम केला. यशस्वीच्या शतकानंतर सेहवागने इन्स्टा स्टोरीवर प्रतिक्रिया दिली. यशस्वीने सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले. फिरकी गोलंदाजीचा ज्या पद्धतीने समाचार घेतला पाहिजे, त्याच पद्धतीने घेत आहे. 

तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला होता. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. टीम इंडियाला पहिल्या डावाच्या आधारे 126 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 19 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी इंग्लिश गोलंदाजांना फोडून काढले. दोन्ही फलंदाजांनी सहज धावा केल्या. विशेषतः यशस्वी जैस्वाल तुफानी शैलीत दिसला. 

सलामीवीर बेन डकेटने इंग्लंडकडून पहिल्या डावात 153 धावांची शानदार खेळी केली. मात्र यानंतर उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. जॅक क्रोली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि बेन फोक्ससारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. भारताकडून मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने 4 फलंदाजांना बाद केले. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. जसप्रीत बुमराह आणि रवी अश्विनने 1-1 इंग्लिश फलंदाजांना बाद केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts