pune police has made a new plan to bring crime under control in pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी (Pune Crime News)   पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमितेश कुमार यांनी कंबर कसली आहे. सगळ्या अट्टल गुन्हेगारांती परेड काढल्यानंतर, त्यांना दम दिल्यानंतर पुणे पोलिसांनी आता सगळ्या गुन्हेगारांची  प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांनी डिजीटल नजर देखील असणार आहे. 

गुन्हेगारीच्या घटना नियंत्रणात आणून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना केली जाणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करून या नव्या युनिटीची स्थापना केली जाणार आहे. या अंतर्गत पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार आहे.

पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी दोन दिवस सुमारे 500 गुन्हेगारांना एकत्र बोलून त्यांची परेड काढली. त्यांना सज्जड दम दिला. कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही अशा सुचना दिल्या त्यानंतर मात्र रिल्स  व्हायरल करणं सुरुच होतं. त्यामुळे आता पोलिसांनी थेट सगळ्या गुन्हेगारांचे सोशल मीडिया अकाऊंट तपासले जाणार आहे. 

सराईत गुन्हेगाराची आणि गुन्ह्यांची यादी तयार

पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्याच काही दिवसांच ही गुन्हेगारी रोखण्यासाठी चंग बांधला आहे. त्यातच पुण्यातील कुख्यात गुंड आणि गुन्हेगारांना बोलवून त्यांची परेड काढली. त्यानंतर ड्रग्स तस्करांना बोलवून त्यांना सज्जड दम दिला. कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा विचार केला तर याद राखा, अशा शब्दांत त्यांना दम दिला. त्यानंतर सोशल मीडियावरुन गुन्हेगारी पसरवायची नाही, रिल्स पोस्ट करायचे नाही, अशा कडक शब्दांत सूचना दिल्या. त्यानंतर आता पिस्तूल धारकांवर पुणे पोलिसांनी नजर असणार आहे. या सगळ्या गुन्हेगाराची यादी तयार केली आहे. त्यांना बोलवून दम दिला जण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Rohit Pawar On Ajit Pawar : पुतण्याचा काकावर पलटवार!  अजित दादांकडून ही अपेक्षा नव्हती; रोहित पवारांचा हल्लाबोल

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts