Baramati Politics :बारामतीत Supriya Sule – Sunetra Pawar यांच्या विकासरथाची चर्चा,निवडणुकांची नांदी?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात वेगळे रंग भरणारा मतदारसंघ… यंदा मात्र बारामतीची ही माती काहीशी बावरलीय… बारामतीतले मतदार बुचकळ्यात पडलेत… कारण, ज्या मातीने फक्त पवारांच्या माथी विजयाचा गुलाल लावला, ज्या बारामतीकरांनी फक्त पवारांच्या गळ्यात विजयाचे हार घातले… त्याच पवार घराण्यात पहिल्यांदाच सर्वात मोठी राजकीय फूट पडलीय… सुप्रिया सुळे आणि अजित पवार.. नात्याने बहिण-भाऊ.. आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात म्हणाल तर एकमेकांची ढाल.. मात्र आता याच ताई आणि भावाने एकमेकांविरोधात राजकीय तलवारी उगारल्या आहेत… ज्या मैदानात दादा सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरायचे.. ज्या मैदानात दादांनी ताईंच्या विजयासाठी जीवाचं रान केलं.. आज त्याच मैदानात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार व्हाया सुनेत्रा पवार असा वाद कसा उभा राहिलाय..</p>

[ad_2]

Related posts