Smartphone technology marathi news Is your phone storage full You can empty it without deleting anything learn trick

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Smartphone : आजच्या धावपळीच्या युगात स्मार्टफोन (Smartphone) हा एक जणू जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलाय. बरीचशी कामं या स्मार्टफोन शिवाय शक्य होत नाहीत. स्मार्टफोनमुळे आपले जीवन खूप बदलले आहे. भविष्यात हे उपकरण आणखी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज जगभरात अनेक लोक फोनवर अनेक गोष्टी करतात. त्यासाठी त्यांना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचीही गरज भासत नाही. अशात आता इंटरनेटमुळे जीवन खूप सोपे झाले आहे. आजच्या काळात इंटरनेटला (Internet) खूप महत्त्व आले आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी डाउनलोड करून ठेवतो. या डाऊनलोडिंगमुळे आपल्या फोनचे स्टोरेज भरून जाते आणि फोन हँग होऊ लागतो. पण तुम्हाला माहित आहे का? आता तुमच्या फोनचे स्टोरेज फुल्ल झाल्यास, कोणतेही अॅप डिलीट न करता ते रिकामे करू शकता. भन्नाट ट्रिक जाणून घ्या..

 

फोनमध्ये असलेली प्रत्येक फाईल महत्त्वाची असते, ती आपण हटवूही शकत नाही

अनेक वेळा असे होते की, फोनचे स्टोरेज अचानक संपते, ज्यामुळे आपण महत्त्वाच्या फाईल्सही डाउनलोड करू शकत नाही. पण फोनमध्ये असलेली प्रत्येक फाईल महत्त्वाची असते आणि ती आपण हटवूही शकत नाही. अशात आम्ही तुम्हाला एका महत्त्वाच्या ट्रिकबद्दल माहिती देत ​​आहोत. ज्याद्वारे तुम्ही फोनमधील काहीही डिलीट न करता तुमच्या फोनचे स्टोरेज रिकामे करू शकता. कसे ते जाणून घ्या

 

काहीही डिलीट न करता तुमच्या फोनचे स्टोरेज रिकामे करा, ट्रिक जाणून घ्या

फोनचे स्टोरेज फुल्ल झाल्यानंतर फोन हँग होऊ लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या फोनचे स्टोरेज रिकामे करावे लागेल. यासाठी तुम्ही गुगल ड्राइव्हची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या फाइल्स येथे अपलोड करू शकता. यामुळे फोनही मोकळा होईल आणि महत्त्वाच्या फाइल्स डिलीट कराव्या लागणार नाहीत.

हे करणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. यासाठी तुमच्याकडे हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. तुम्हाला फक्त Google Drive ॲप उघडावे लागेल. यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करावे लागेल.

या चिन्हावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व आवश्यक फाइल्स येथे अपलोड कराव्या लागतील. अशा प्रकारे, ॲप्स फाइल्स न हटवता फोनमध्ये जागा तयार करू शकतात.

आणखी एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही जागा तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फोनचा बॅकग्राउंड डेटा क्लियर करावा लागेल. तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन जास्त वापरत नसलेल्या ॲप्सची Cache साफ करू शकता.

 

हेही वाचा>>>

Google वर आता तुमचं नावही सर्च करू शकता, गुगलवर तुमचे नाव Add कसे कराल? खास ट्रिक जाणून घ्या

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts