Aaditya Thackeray challenges CM Eknath Shinde to contest election against him from Thane Maharashtra politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाचं  आव्हान दिलं आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभांचा धडाका लावला आणि ठाण्यात ‘इलाका हमारा और धमाका भी हमारा होगा’ असं म्हणत एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde)ठाण्यात आपल्या विरोधात उभे राहण्याचं आव्हान दिलय. 

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा  ठाणे जिल्हा आणि याच ठाणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष केंद्रित करत आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला नाही. तर ‘हा इलाका भी हमारा आणि धमाका भी हमारा’ असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये सभांचा धडाका लावला. आनंद नगर, मनोरमा नगर, चंदनवाडी, जिजामाता नगर या चार शाखांच्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी सभा घेतल्या. मात्र संपूर्ण ठाणे शहरात एक प्रकारे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलं आणि या  सभांमध्ये थेट एकनाथ शिंदेंनाच आदित्य ठाकरे यांनी आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आव्हान दिलं.

 माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, हा कोणाचा बालेकिल्ला नाही  

आदित्य ठाकरे हे आव्हान देऊनच थांबले नाहीत तर एकनाथ शिंदे ही घटनाबाह्य अपयशी मुख्यमंत्री आणि  शिवसैनिक म्हणून अपयशी ठरल्याचा उल्लेख त्यांनी केला. 20 मे 2022 ला एकनाथ शिंदे हे वर्षावर येऊन उद्धव ठाकरे समोर रडले आणि भाजप मला जेलमध्ये टाकेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर एका महिन्यातच त्यांनी  गद्दारी केली असं आदित्य ठाकरेंनी भाषणात सांगितलं… त्यामुळे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यात शड्डू ठोकल्यानंतर आणि  आव्हान दिल्यानंतर शिवसेना शिंदे गट  आणि भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या या प्रतिक्रिया विरोधात भाष्य करायला सुरुवात केली.
 
आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान 

 याआधी सुद्धा अशाच प्रकारची आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट  ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष ठेवून आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या ठाण्यात पक्षाचे बळ वाढावं यासाठी मेळावे सभा दौरे ठाकरे गटाकडून आयोजित केले जाताय. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या शाखा भेटींचा कार्यक्रम कल्याण लोकसभा मतदारसंघातून काही दिवसांपूर्वी सुरू केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कल्याण मध्ये जाऊन सभा घेतली आणि आता ठाण्यामध्ये शाखा भेटी सुरू केल्या त्यामुळे  पक्षाकडून पूर्ण ताकद या  ठाणे जिल्ह्यात लावताना पाहायला मिळतय.

बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी हे एकनाथ शिंदें सोबत

सध्या ठाण्याची राजकीय परिस्थिती बघितली  तर विद्यमान खासदार शिवसेना ठाकरे गटाचा असला तरी ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी हे एकनाथ शिंदें सोबत आहेत. मात्र, नेते जरी त्यांच्यासोबत असले तरी  ठाण्यातील मतदार हा आपल्या बाजूने असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय आणि याच  एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलय. त्यामुळे ठाणे असेल की मग कल्याण  लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोण कोणाचा आव्हान स्वीकारत हे स्पष्ट होईल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts