Sharad Pawar MVA consensus on 39 Lok Sabha seats, I will be happy if Shahu Maharaj is a candidate from Kolhapur says Sharad Pawar Maharashtra Politics Marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar In Kolhapur : “महविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जांगावर एकमत झालं आहे. लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल.  शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल”, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. शरद पवार यांनी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी न्यू पॅलेस येथे भेट घेतली यावेळी ते बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ.  भाजप देशात 400 पेक्षा जास्त आणि राज्यात 40 पेक्षा जास्त जागा सांगत आहे. मला वाटतं हे खूप कमी आकडे सांगत आहेत, असा उपरोधित टोलाही शरद पवारांनी लगावला. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, येथे शिवछत्रपतींचा पुतळा होता. तो पुतळा शाहू महाराजांनी बसवला होता. कालच्या कार्यक्रमाला मालोजीराजे आणि शाहू महाराज येणार होते. मात्र ते येऊ शकले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी मी कोल्हापुरात कार्यक्रमात येणार होतो. त्यावेळी त्यांची भेट घ्यावी, असं मी म्हणालो. मी ठरवलं की काल त्यांची भेट झाली नाही. तर आज कोल्हापुरात आलो तर भेट घ्यावी. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts