‘मी इथं शहीद झालो तर राम मंदिराचा..’; बाबरी पतनानंतर अडवाणींनी उमा भारतींना स्पष्टच सांगितलेलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uma Bharti On Lal Krishna Advani: भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पतनासंदर्भातील काही नवे धक्कादायक खुलासे केले आहेत. हे खुलासे लालकृष्ण अडवाणींसंदर्भात आहेत. उमा भारती यांनी 6 डिसेंबर रोजी बाबर मशीद पडल्यानंतर नेमकं काय घडलं होतं याबद्दल बोलताना एक किस्सा आवर्जून सांगितला ज्यामध्ये त्यांनी अडवाणींच्या जीवाला धोका होता असा उल्लेख केला. बाबरीचं पतन 6 डिसेंबर 1992 रोजी झालं. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 8 डिसेंबर रोजी लालकृष्ण अडवाणींसहीत 5 जणांना अटक झाली तेव्हाचा किस्सा उमा भारतींनी…

Read More