( प्रगत भारत । pragatbharat.com)
Uma Bharti On Lal Krishna Advani: भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पतनासंदर्भातील काही नवे धक्कादायक खुलासे केले आहेत. हे खुलासे लालकृष्ण अडवाणींसंदर्भात आहेत. उमा भारती यांनी 6 डिसेंबर रोजी बाबर मशीद पडल्यानंतर नेमकं काय घडलं होतं याबद्दल बोलताना एक किस्सा आवर्जून सांगितला ज्यामध्ये त्यांनी अडवाणींच्या जीवाला धोका होता असा उल्लेख केला. बाबरीचं पतन 6 डिसेंबर 1992 रोजी झालं. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 8 डिसेंबर रोजी लालकृष्ण अडवाणींसहीत 5 जणांना अटक झाली तेव्हाचा किस्सा उमा भारतींनी सांगितला आहे.
अडवाणींनी ते पत्र खिशात ठेवलं
8 डिसेंबर रोजी अडवाणींबरोबरच अशोक सिंघल, मुरली मनोहन जोशी, विष्णुहरी डालमिया, विनय कटिया आणि उमा भारतींना अटक करण्यात आली. या सर्वांना आग्रा येथील तुरुंगामध्ये नेण्यात आलं. तिथे अडवाणींकडून 6 डिसेंबरच्या घटनेसंदर्भात एक रिग्रेट (खेदपत्र) लिहित होते. ते पत्र पाहून उमा भारतीयांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर अडवाणींनी हे पत्र कोणालाही न पाठवता आपल्या खिशात ठेवलं. मात्र या पत्रात नक्की काय लिहिलेलं होतं याचा खुलासा उमा भारतींनी केला नाही. तरी या घटनेनंतरचा एक किस्सा त्यांनी आवर्जून सांगितलं.
नंतर काय घडलं?
उमा भारतींनी, ‘या घटनेनंतर काही दिवसांनी आम्हाला उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यातील मता टीला रेस्ट हाऊस (इथे तात्पुरत्या स्वरुपाचं तुरुंग उभारण्यात आलेलं) येथे एक महिना ठेवण्यात आलं. या ठिकाणी अडवाणी रोज सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता मोकळ्या लॉनवर चालायला जायचे. या वेळेस तुरुंग अधिकाऱ्यांनी माझ्या मार्फत अडवाणींना एक संदेश पाठवला होता. तुम्ही सुरक्षेत असलात तरी लांबच्या झाडावरुन एखाद्याने टेलिस्कोप रायफलचा वापर केल्यास तुमचा जीव संकटात सापडू शकतो. त्यामुळेच सायंकाळी अंधारात फेरफटका मारयला जाऊ नये,” असं सांगितलं. अधिकाऱ्यांचा हा निरोप उमा भारतींनी अडवाणींना दिल्यावर ते काय म्हणाले याची माहितीही त्यांनी दिली.
अडणवींना हे कळालं तेव्हा…
“हे (अधिकाऱ्यांचं म्हणणं) अडवाणींना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी, ‘मी इथे शहीद झालो तर राम मंदिराचा देशाचा संकल्प लवकर पूर्ण होईल’ असं म्हटलं होतं. त्यांनी हे विधान मी तिथं एकटीच असताना केलं होतं. ते एक वडील आणि नेता म्हणून त्यांच्या मुलीला आणि अनुयायाला सांगत होते,’ असं उमा भारती म्हणाल्या.
याहून चांगला दिवस नाही
22 जानेवारी रोजी पंतप्रधानांना यजमान म्हणून रामल्लांची प्राणप्रतिष्ठापणा करताना मला माझ्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा आहे. याहून अधिक चांगला दिवस माझ्या आयुष्यात नसेल, असं उमा भारती यांनी म्हटलं.