( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणातील नालगोंदा जिल्ह्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दोन रस्ते अपघातांमध्ये एकूण पाचजण ठार झाले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे दृश्यमानता कमी असून त्यामुळेच हे अपघात झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पहिला अपघात झाला. यामध्ये दुचाकीने पादचाऱ्याला उडवलं होतं. या अपघातात दोनजण ठार झाले होते. 28 वर्षीय नागराजू दुचाकी चालवत होता. तर 19 वर्षीय रामवत केशवर हा रस्त्यावरुन चालत होता. नागराजू भरधाव…
Read More