‘..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..’, ‘डरपोक’ म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, ‘मोदी-शहा कर्णाचे..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Kejriwal Arrest: आचारसंहिता लागू झाली असताना निवडणुकीत उतरलेल्या सरकारविरोधकांपैकी एका मुख्यमंत्र्यासला अटक करुन मुस्कटदाबी करणे हे कसले लक्षण समजायचे? असा सवाल अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरुन ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य गैरव्यवहारप्रकरणी 28 एप्रिलपर्यंत सक्तवसुली संचलनालयाची कोठडी सुनावण्यात आली आहे. केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अचानक अटक झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून विरोधकांनी केंद्र सरकारला यावरुन लक्ष्य केलं आहे. असं असतानाच आता ठाकरे गटानेही मोदी सरकारने केलेली कारवाई ‘हा तर डरपोकपणा’ असल्याचं म्हटलं आहे. …तर भाजपाचे नवे…

Read More