“फ्रान्समधली दंगल थांबवायची तर योगींना बोलवा”; युरोपातल्या डॉक्टरची अजब मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) France Riots : गेल्या पाच दिवसांपासून फ्रान्समध्ये (France) सतत हिंसाचार सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका किशोरवयीन तरुणाची पोलिसांनी (France Police) गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करत फ्रान्समध्ये दंगली घडवल्या आहेत. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या वापर केला जात आहे. या आंदोलनातून 875 जणांना अटक करण्यात आली असून या संघर्षात 200 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. फ्रान्समधील या गंभीर परिस्थितीमध्ये युरोपियन डॉक्टर आणि प्रोफेसर…

Read More