Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाबद्दल (ASI) अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने सर्वेक्षणाला दिलेली स्थगिती कायम ठेवली असून, त्यात वाढ केली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात 3 ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण केलं जाऊ शकत नाही.  आतापर्यंत काय झालं आहे? हायकोर्टाने एएसआय सर्वेक्षण करण्यास परवानगी दिल्यानंतर ज्ञानवापी मशीद परिसरात 24 जुलैला सकाळी अधिकारी पोहोचले होते. एएसआयच्या पथकाने सकाळी 7 वाजता ज्ञानवापी परिसरात पोहोतच…

Read More