पोलीस कर्मचाऱ्याने हटकल्याने संतापला, 120 किमी वेगाने यु-टर्न घेत मागे फिरला; ASI ला धडक देत केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आपल्या रस्त्यात रोखल्याने एक एसयुव्ही चालक इतका नाराज झाला की, त्याने चक्क धडक देत सहाय्यक पोलीस निरीक्षकाला ठार केलं. धडक देण्यासाठी तो यु-टर्न घेऊन मागे आला होता. धडक इतकी जबरदस्त होती की, एसयुव्ही चालकही ठार झाला आहे. तसंच पोलिसांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे.  जोधपूरच्या करवड ठाणे क्षेत्राच्या जोधपूर-नागौर हायवेवर मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एसयुव्ही चालक गाडी चालवत असताना कोणाशी तरी भांडत होता. यावेळी त्याने मद्यपानही केलं होतं. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने…

Read More

Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाबद्दल (ASI) अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने सर्वेक्षणाला दिलेली स्थगिती कायम ठेवली असून, त्यात वाढ केली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात 3 ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण केलं जाऊ शकत नाही.  आतापर्यंत काय झालं आहे? हायकोर्टाने एएसआय सर्वेक्षण करण्यास परवानगी दिल्यानंतर ज्ञानवापी मशीद परिसरात 24 जुलैला सकाळी अधिकारी पोहोचले होते. एएसआयच्या पथकाने सकाळी 7 वाजता ज्ञानवापी परिसरात पोहोतच…

Read More