( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: अयोध्येमधील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडल्यानंतर याच मंदिराबाहेरील एका भाषणात पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येच्या मंदिराबाहेर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहीत अनेक मान्यवरांनी भाषणं केली. मात्र या भाषणांदरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यापद्धतीने स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी…
Read More