MRF Share Price MRF Hits Rs 1 Lakh Mark Becomes First Such Stock On Dalal Street

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MRF Share Price: एमआरएफचा (MRF Share) समभाग 1 लाख रुपयांच्या पार गेला आहे. एक लाखाचा टप्पा ओलांडणारा पहिला स्टॉक आहे. एमआरएफ समभाग आज 1.37 टक्क्यांनी वाढला, ज्यामुळे त्याची किंमत एक लाख 300 वर गेला. कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने टायर कंपन्यांच्या समभागात तेजी आली आहे. सेन्सेक्सनं आज पुन्हा 63 हजारांचा टप्पा गाठला. 

MRF स्टॉकनं (MRF Stock) मंगळवारी इतिहास रचला. MRF हा एक लाख रुपयांचा आकडा गाठणारा भारतातील पहिला स्टॉक ठरला आहे. बीएसईवर आज हा शेअर 99,500 वर उघडला आणि सकाळच्या सत्रातील व्यवहारात 1,00,300 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 

बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 19 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत गेल्या एका वर्षात हा शेअर 45 टक्क्यांनी वधारला आहे. 17 जून 2022 रोजी MRF समभागांनी BSE वर 65,900.05 या 52 आठवड्यांच्या निचांकी पातळी गाठली होती. 

मार्च तिमाहीत कंपनीची मजबूत कामगिरी

चौथ्या तिमाहीत एमआरएफ कंपनीनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. FY23 च्या मार्च तिमाहीत, MRF चा स्टँडअलोन नफा 162 टक्क्यांनी वाढून 410.66 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीची ऑपरेटिंग परफॉर्मंस मजबूत झाली आहे. तसेच, कंपनीच्या ऑपरेशनमधून स्टँडअलोन महसूल वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 5,725.4 कोटी रुपये झाला आहे. कंपनीनं प्रति शेअर 169 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

हजार रुपयांपासून लाख रुपयांपर्यंतचा प्रवास 

MRF चे शेअर्स बघितले तर 2000 साली शेअरची किंमत प्रति शेअर एक हजार रुपये होती. तर 2012 मध्ये तो 10,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. यानंतर 2014 मध्ये हा शेअर 25,000 रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर 2016 मध्ये तो 50,000 रुपयांवर पोहोचला. 2018 मध्ये 75,000 आणि आता एक लाख रुपयांचा आकडा पार केला आहे. 27 एप्रिल 1993 रोजी एमआरएफच्या एका शेअरची किंमत 11 रुपये होती.

एवढा महाग का आहे हा शेअर? 

एमआरएफचा स्टॉक इतका महाग का आहे? असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल. यामागील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे, कंपनीचे शेअर्स स्प्लिट (Stock Split) न करणं हे आहे.  एंजल वननं दिलेल्या माहितीनुसार, MRF नं 1975 पासून कधीही त्यांचे शेअर्स विभाजित केले नाहीत. यापूर्वी, MRF नं 1970 मध्ये 1:2 आणि 1975 मध्ये 3:10 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले होते.

टॉय बलून तयार करण्यापासून केलेली सुरुवात 

MRF चे पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. त्यांची सुरुवात 1946 मध्ये टॉय बलून बनवून झाली. त्यांनी 1960 पासून टायर बनवायला सुरुवात केली. आता ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे. भारतातील टायर उद्योगाची बाजारपेठ सुमारे 60000 कोटींची आहे. JK Tyre, CEAT टायर इत्यादी MRF चे स्पर्धक आहेत. MRF चे भारतात 2500 पेक्षा जास्त वितरक आहेत आणि कंपनी जगातील 75 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. 

[ad_2]

Related posts