नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी खेळी केली आहे. त्यांनी विधानसभेत आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर आरक्षणाची व्याप्ती 65 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याशिवाय 10 टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना दिलं जाणार आहे. म्हणजेच एकूण 75 टक्के आरक्षण दिलं जाईल.  विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश यांनी बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती 50 वरून 65 करण्याचा प्रस्ताव मांडला. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या 10 टक्केचा समावेश करून आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेदरम्यान नितीश  कुमार म्हणाले की, आरक्षण वाढवण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. या अधिवेशनातच बदल…

Read More