‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi Interview:  भाजपचा जाहिरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Read More

2040 पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट; एस. सोमनाथ यांनी दिली चांद्रयान-4 मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISG-ISRS : 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट आहे. भारताची मानवाला चंद्रावर पाठवण्याची मोहिम यश्वसी करण्याच्या अनुषंगाने ISRO ने कास प्लान बनवला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून चांद्रयान-4 मिशन हाती घेतले जाणार आहे. चांद्रयान-4  बाबत ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मोठी अपडेट  दिली आहे.  चांद्रयान-4 मोहिम भारतासाठी टर्निंग पाईंट ठरणार भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. यानंतर आता इस्रोने गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे.  गगनयान मोहिमे अंतर्गत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार आहेत. भारताची ही पहिली…

Read More

LokSabha: ‘…तर तुम्हाला कोणीच मदत करु शकत नाही’, प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही तर राहुल गांधी (Rahull Gandhi) यांना माघार घेण्याबद्दल विचार करावा असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी गेल्या 10 वर्षांपासून अपयशी होत असतानाही एकतर बाजूला पडलेले नाहीत किंवा दुसऱ्या कोणाला पक्षाचे नेतृत्व करू देऊ शकले नाहीत अशी टीकाही केली आहे.  “माझ्या मते हे लोकशाहीविरोधी आहे,” असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षाला पुन्हा जीवनदार देण्याच्या हेतून रणनीती आखली होती. पण धोरणावरुन मतभेद…

Read More

‘क्लास मॉनिटरची निवडणूकही न लढवलेली व्यक्ती 30 वर्षांपासून…’, भाजपात गेलेल्या गौरव वल्लभ यांचे काँग्रेसबद्दल गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, अनेक मोठे खुलासे केले आहेत. काँग्रेस पक्षात गेल्या 30 वर्षांपासून एकच व्यक्ती जाहीरनामा तयार करत असून, त्याने साधी क्लासच्या मॉनिटरची निवडणूक लढलेली नाही असा खुलासा गौरव वल्लभ यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या पीएकडून चालवला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेस पक्षाला नव्या भारताचे मुद्दे आणि आकांक्षा समजत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.  “मी जेव्हा कॉलेजात होतो तेव्हा तो प्रवक्ता म्हणून टीव्हीवर…

Read More

‘CBI सारख्या यंत्रणांनी…’, चंद्रचूड यांचा सल्ला; कान टोचत म्हणाले, ‘मागील काही वर्षांमध्ये..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On CBI: केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्रीय यंत्रणांना खडेबोल सुनावले आहेत. 20 व्या डी. पी. कोहली स्मृती व्याख्यानमालेतील आपल्या भाषणामध्ये न्या. चंद्रचूड यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. केंद्रीय तपास यंत्रणांची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळेच या यंत्रणांनी आता आर्थकि गैरव्यवहार आणि देशविरोधी कायरवायांचा समावेश असलेल्या प्रकरणांकडे सर्वात जास्त लक्ष द्यायला हवं, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.  सीबीआयने आपल्या भूमिकेवर ठाम राहणं गरजेचं माझ्या मते मागील काही वर्षांमध्ये आपण आपल्या केंद्रीय…

Read More

केजरीवाल यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला! तिहारमध्ये शिफ्ट करणार; दिल्लीच्या CM ला हवीत ‘ही’ 3 पुस्तकं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kejriwal Sent To Judicial Custody: सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ईडीच्या न्यायालयीन कोठडीमधील मुक्काम वाढला आहे. केजरीवाल यांना पुढील 2 आठवड्यांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 21 मार्च रोजी केजरीवाल यांना कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने राहत्या घरातून चौकशीनंतर ताब्यात घेतलं होतं. मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. आज केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्वात आधी केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत आणि त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्यात आता आणखीन 14 दिवसांची भर पडली आहे. राउज एवेन्यू…

Read More

LokSabha: निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांची सपंत्ती किती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nirmala Sitharaman Net Worth: लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करत आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मात्र भाजपाचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमन यांनी आपल्याकडे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याचं कारण सांगितलं आहे. दरम्यान आपल्याकडे तितका पैसा नाही म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे हे जाणून घ्या…  निर्मला सीतारमन यांची संपत्ती किती? निर्मला सीतारमन यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा…

Read More

'माझं आयुष्य पूर्णपणे…,' अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली आहे. दरम्यान अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून मी जेलच्या आत असो किंवा बाहेर, माझं आयुष्य देशासाठी समर्पित आहे असं ते म्हणाले आहेत.   

Read More

इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांचा डिपफेक व्हिडीओ; चेहऱ्यावर लावला अ‍ॅडल्ट स्टारचा फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा डीपफेक व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील अ‍ॅडल्ट वेबसाईटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. 40 वर्षीय आरोपीने आपल्या 73 वर्षीय वडिलांच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करत अपलोड केला होता. दरम्यान याप्रकरणी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. बीबीसीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.  आरोपींनी जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान होण्याआधी म्हणजेच 2022 मध्ये हा डीपफेक व्हिडीओ तयार केला होता. आरोपींनी एका अ‍ॅडल्ट फिल्म स्टारच्या चेहऱ्यावर जॉर्जिया मेलोनी यांचा चेहरा लावला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला…

Read More

‘पुतिन यांचा विजय हुकूमशाही’, ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘मोदीशाही, ‘चारसौ पार’च्या..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Udddhav Thackeray Group Slams Modi Government Over Dictatorship: रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ब्लादिमीर पुतीन यांनी मिळवलेल्या विजयाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने भारतामधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. रविवारी रशियातील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानुसार पुतिन हे 88 टक्के मते मिळवत विजयी ठरले. सलग पाचव्यांदा पुतिन हे रशियाची सूत्रं हाती घेणार आहेत. मात्र पुतिन यांचा हा विजय म्हणजे ‘रशियात पुन्हा हुकूमशाही’ असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. रशिया पुन्हा पुतीन यांच्या पोलादी पंजामध्ये “रशियामध्ये अपेक्षेप्रमाणे ब्लादिमीर पुतीन पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अर्थात या विजयामध्ये आश्चर्य काहीच नाही. पुतीन…

Read More