‘तू कोर्टात काळे कपडे का घालत नाहीस?’, सुकेशने जेलमधून जॅकलीनला पाठवलेले मेसेज आले समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी महाठग सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस एकमेकांवर सतत गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान 200 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सध्या जेलमध्ये असणारा प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला काही व्हॉट्सअप मेसेज पाठवले आहेत. जेलमध्ये असतानाही त्याने बनावट नंबरच्या आधारे हे मेसेज पाठवले आहेत. यामधील एका मेसेजमध्ये सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्रीली कोर्टात सुनावणीदरम्यान काळे कपडे घालण्याचा आग्रह केला होता. 30 जून 2023 रोजी पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये सुकेशने लिहिलं होतं की, “बेबी, या महिन्यात 6 तारखेला आपली कोर्टाची तारीख आहे. जर तुला सुनावणीसाठी हजर केलं…

Read More