[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे.
दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले.
वारकरी प्रस्थानावेळी वारकऱ्यांचा आणि पोलिसांचा शाब्दिक वाद झाला. त्याचवेळी वारकऱ्यांनी बॅरिकेड्स लोटून देत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
पोलिस त्यांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र वारकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. त्यात पोलिसांनी आक्रमकपणे वारकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी पोलिसांनी हातातील लाठ्याही पोलिसांवर उगारल्या. त्यानंतर थोड्या वेळात प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.
मात्र हजारोंच्या संख्येने असलेले वारकरी आक्रमक झाले आहेत. काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मंदिरात ४७ दिंड्यांना प्रवेश आहे. प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना त्यात प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश आहे. त्यामुळे मंदिराच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या वारकऱ्यांना प्रवेश नाही, अशांनी प्रवेश देण्याचा आग्रह केला. त्यातून पोलीस आणि वारकऱ्यांच्या झटपट झाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सद्या पोलिसांकडून मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचे समोर येत आहे.
[ad_2]