Ios 17 Iphone Users Rejoice You Will Soon Take Advantage Of These Amazing New Features Know How To Get The Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Apple WWDC 2023: ॲपलने iOS 17 ची घोषणा केली, हे एक असं व्हर्जन आहे ज्यात संवाद साधणं आणखी सोपं होणार आहे. फेसटाइम (FaceTime) आणि मेसेजिंगचा (Messaging) दर्जा सुधारला जाणार आहे. एअरड्रॉपने (AirDrop) आता फोन नंबर आणि ई-मेल आयडी शेअर करणं देखील शक्य होणार आहे. iOS 17 मुळे टायपिंगचा वेग वाढणार आहे आणि टायपिंग अचूकपणे करणं शक्य होणार आहे.

जर iOS च्या नवीन फिचरबद्दल बोलायचं झालं तर, iOS 17 अपडेटमध्ये वापरकर्त्यांना व्हॉइसमेलचे रिअल-टाइम भाषांतर करण्याची सुविधा मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कोणताही कोरियन व्हॉइस मेल आला असेल तर तुम्ही त्याचे हिंदीमध्ये भाषांतर करून उत्तर देऊ शकाल. त्याशिवाय, तुमच्या फोनला इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसली तरी रिअल टाइम नकाशे तुम्हाला आरामात वापरता येणार आहे.

iOS 17 अपडेट कधीपर्यंत उपलब्ध होणार?

iOS 17 सॉफ्टवेअर अपडेट सर्वप्रथम येत्या सप्टेंबरच्या मध्यात सर्व आयफोन स्मार्टफोन्सवर आणले जाऊ शकते. येत्या सप्टेंबरमध्ये लॉन्च होणाऱ्या iPhone 15 स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट iOS 17 अपडेट दिले जाईल. यासोबतच उर्वरित आयफोन वापरकर्त्यांसाठी iOS 17 चे अपडेट लवकरच आणले जाईल.

iOS 17 चे खास फिचर्स कोणते?

  • नवीन iOS 17 अपडेटमध्ये लाइव्ह व्हॉइस मेल फिचर दिले जाईल. यासोबतच लाइव्ह ट्रान्सक्रिप्शन फिचरही उपलब्ध असेल. म्हणजेच, याचा अर्थ असा की वापरकर्ते त्यांच्या कोणत्याही जुन्या रेकॉर्डिंगचे रिअल टाइममध्ये भाषांतर करू शकणार आहेत.
  • यात आणखी एक नवीन फिचर आहे, ते म्हणजे फेसटाइम (FaceTime) फिचर. जर एखाद्याने तुमचा कॉल मिस केला असेल, तर हे फीचर आपोआप व्हिडीओ मेसेज (Video Message) पाठवेल.
  • यामध्ये iMessages चे सर्च फिल्टर देखील अपडेट करण्यात आले आहे. म्हणजेच वापरकर्ते आता फक्त स्वाइप करून रिप्लाय देऊ शकतील. याशिवाय यात तुमचे ऑडिओ मेसेज आपोआप ट्रान्सक्रिप्शन करण्याची सुविधा आहे.
  • आता यूजर्स या नवीन iOS 17 अपडेटमध्ये तुमचे लोकेशन iMessage मध्ये शेअर करू शकता.
  • इतकेच नाही तर या अपडेटच्या मदतीने आता ऑफलाइन मोडमध्येही नकाशे वापरता येणार आहेत. आयफोन वापरकर्ते आता कोणत्याही फोटोवरून त्याचे स्टिकर्स तयार करू शकतात आणि मोशन फोटो वापरून थेट स्टिकर्स देखील तयार करू शकतात.
  • यूजर आता एअरड्रॉप (AirDrop) वापरून नवीन यूजरसोबत फोन नंबर स्वॅप करू शकतो. फोन नंबर आणि ईमेल आयडी एअरड्रॉपने शेअर करणं शक्य होणार आहे.

कोणत्या फोनला मिळेल iOS 17 अपडेट?

iOS 17 अपडेट फक्त iPhone XS, iPhone XS Max, iPhone XR, iPhone 11, iPhone 12 Series, iPhone 13 Series, iPhone 14 Series साठी उपलब्ध असेल.

हेही वाचा:

Apple : ‘या’ iPhone मध्ये iOS 17 सपोर्ट करणार नाही, यादीत तुमचा फोन तर नाही ना? जाणून घ्या..

[ad_2]

Related posts