What Happens If Wtc Final Match Ends In Draw Ind Vs Aus Icc World Test Championship Oval Cricket Ground India Australia

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WTC Final 2023: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. हा सामना द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात..

पावसाची शक्यता आहे का ? – 

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लंडनमध्ये लढत होणार आहे. हवमान विभागाच्या अंदाजानुसार, या सामन्यात पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हलक्या ते मध्यम सुरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्यादरम्यान 18 ते 22   डिग्री सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे.  

सामना अनिर्णित राहिल्यास कोण होणार विजेता ?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा सामन्याचा पाच दिवसात निकाल लागला नाही. म्हणजे सामना अनिर्णित राहिला बरोबरीत सुटला तर दोन्ही संघाला संयुक्त विजेतेपद देण्यात येईल. आयसीसीने आपल्या नियमात याबाबतची माहिती दिली आहे. 
 
राखीव दिवस आहे का ?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवलाय. सात ते 11 जून या पाच दिवसात पाऊस अथवा अन्य कारणामुळे सामना झाला नाही..तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल.  

ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचा रेकॉर्ड –
• भारत- 14 कसोटी सामने, 2 विजय, 5 पराभव, 7 ड्रॉ 
• ऑस्ट्रेलिया- 38 कसोटी सामने, 7 विजय, 17 पराभव, 14 ड्रॉ

भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड – 

एकूण 106 सामने- भारत 32 विजयी, ऑस्ट्रेलिया 44 विजयी, 29 ड्रॉ, 1 टाय

लाईव्ह स्ट्रिमिंग

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. दूरदर्शनवर या सामन्याचे मोफत थेट प्रक्षेपण करणार आहे. याशिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून सामना थेट प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा सामना मोबाईलवरही थेट पाहू शकणार आहात.

पिच रिपोर्ट 
कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. येथे विकेटवर चांगला बाउन्स दिसतो. वेगवान गोलंदाजांसाठी ओव्हलची खेळपट्टी फायदेशीर ठरेल, पण जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी प्रभावी ठरू लागते. तिसऱ्या दिवसाच्या आसपास फिरकीपटूंचं वर्चस्व सुरू होतं. या खेळपट्टीवरील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर असेल तरीदेखील वेगवान गोलंदाजांचा स्विंग हवामानावर अवलंबून असतो. नुकत्याच समोर आलेल्या खेळपट्टीच्या एका फोटोमध्ये विकेटच्या आसपास हिरवळ दिसत होती. अशा प्रकारचा विकेट पेसर आणि सीमर्सना चांगली मदत करू शकते. 

India Squad For WTC Final :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहमद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 

Australia Squad For WTC Final : 

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

[ad_2]

Related posts