( प्रगत भारत । pragatbharat.com)
Dehradun Crime: हल्द्वानीमध्ये हॉटेल व्यावसायिक असलेल्या अंकित चौहान याचा माहीच्या आयुष्यातील हस्तक्षेप वाढत होता. यामुळे त्रासलेल्या माहीने तिचा प्रियकर दीप कंदपाल याच्यासोबत अंकितचा काढा काढण्याची योजना आखली. 8 जुलैला अंकितच्या वाढदिवसालाच त्याच्या सर्पदंशाचा विष प्रयोग घडवून आणण्याचा तिचा बेत होता. मात्र सर्पमित्राने आणलेला साप कमी विषारी असल्याने तिला रणनीती बदलावी लागली. यानंतर 14 जुलैच्या रात्री दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून अंकितचा विषारी नागाने चावा घेतल्याने मृत्यू झाला.
योजनेनुसार माहीने शुक्रवारी रात्री सहा वाजता अंकितला घरी बोलावले. त्याला झोपेच्या गोळ्या मिसळून दारू पाजण्यात आली, त्यामुळे तो अर्धवट बेशुद्ध झाला, त्यानंतर त्याला बेडवर उलटे झोपवले, अशी माहिती गारुडी रमेश नाथने पोलिसांच्या चौकशीत दिली.
शुद्धीवर आल्यावर अंकितने विरोध केला नाही. सर्पदंश घडवून आणण्यापूर्वी एकाने अंकितचा हात धरला तर दोघांनी पाय धरले आणि चौथा अंकितच्या पाठीवर बसला. त्यानंतर गारुडी रमेशने अंकितच्या एका पायावर कोब्रा दंश घडवूनआणला. 10 मिनिटे वाट पाहिली. अंकितचे शरीर ढवळत राहिले. यानंतर, पुन्हा दुसऱ्या पायावर दंश देण्यात आला,असे त्याने सांगितले.
अंकितची माहीसोबत चार वर्षांपासून मैत्री होती. दोघांचे प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी हलदुचौद नवा बाजार येथे राहणारा दीप कंदपाल माहीच्या आयुष्यात आला. दोघांचे प्रेमसंबंध तयार झाले. अंकितच्या सवयीमुळे माही नाराज होती. तिने अनेक वेळा अंकितला सोडण्याचा विचार केला होता. तिने अंकितला अनेकदा नकारही दिला होता पण तो तिच्या घरी येणं सोडत नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तो कधीही माहीच्या घरी यायचा. तसेच दारूही प्यायचा. यामुळे माही वैतागली होती. त्यामुळे तिने दीप कांडपालला सोबत घेऊन अंकितला मारण्याची योजना आखली. 8 जुलै रोजी अंकितचा वाढदिवस होता. माहीने त्या दिवशी अंकितला मारण्याचा प्लान बनवला. घरी केक मागवला. ठरल्याप्रमाणे अंकितला घरी बोलावले. अंकितला दारूच्या नशेत झोपेची गोळी देऊन बेशुद्ध करण्याचा प्लॅन होता. त्यानंतर त्याला सर्पदंश करवून मृतदेह गाडीसह खड्ड्यात टाकायचा होता.
8 जुलै रोजी दुपारी 2 वाजता गारुडी साप घेऊन गोरापाडव येथील माहीच्या घरी पोहोचले. माही आणि दीप कंदपाल यांनी हा साप पाहिला. साप कमी विषारी असल्याचे त्यांनी अंकितला मारण्याची योजना त्यावेळी रद्द केली. कारण माहीला कोणतीही चूक करायची नव्हती. जर त्याला कमी विषारी साप चावला आणि तो वाचला तर अंकित त्यांचा पर्दाफाश करेल अशी भीती त्यांना वाटत होती.
मात्र त्यादिवशी माही, अंकित, दीप, नोकर, गारुडी आणि मोलकरीण हे रात्री उशिरापर्यंत नाचत राहिले. अंकित जास्त दारू पिऊन बेशुद्ध होईल, असे त्यांना वाटले. मात्र तो बेशुद्ध न झाल्याने डावपेच बदलावा लागला.
त्यानंतर माहीने गारुड्याला विषारी कोब्रा आणण्यास सांगितले. अंकित रोज माहीच्या घरी जायचा. तेथे तो पिऊन शिवीगाळही करीत असे. यामुळे माही अस्वस्थ होऊ लागली. 10 दिवसांपूर्वी माहीने अंकितच्या घरी जाऊन चांगलाच गोंधळ घातला होता. यानंतरही अंकितचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरूच होते.