[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दर्शना पवारची घटना ताजी असतानाच आता पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. या घटनेने राज्यात खळबळ उडालीय. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील काळजाचा थरकाप उडवतात. पुण्यातील सदाशिव पेेठेतील ही घटना आहे. या युवतीनं प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने तिचा पाठलाग करून तिच्यावर कोयत्याने वार केले. त्याचवेळी लेशपाल जवळगे या युवकाने हा प्रकार पाहिला आणि तातडीने युवतीच्या मदतीला धावला. त्याने हल्ला करणाऱ्या तरुणाला रोखलं आणि चोप दिला. एवढंच नाही तर त्याने त्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान या हल्ल्यात ती तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या निमित्ताने पुण्यात चाललंय तरी काय, असा संतप्त प्रश्न विचारला जातोय.</p>
[ad_2]