Maharashtra Rain News Less Rainfall In The State In The Month Of June imd Rain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Rain : महाराष्ट्रात कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पाऊस (Rain) बरसत असताना दिसत असला तरी उर्वरीत महाराष्ट्रात (Maharashtra) अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी 209.8 मिमी पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. संपूर्ण देशात सर्वात कमी पावसाची नोंद ही मराठवाड्यात झाली आहे. अशातच मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आव्हानं वाढली आहेत. 

बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून लांबला

सध्या राज्याच्या काही भागात पाऊस सुरु आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. सरासरीच्या उणे 46 टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचं बघायला मिळत आहे. दुसरीकडं, राज्यात जून महिन्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळं लांबलेला मान्सून दाखल होण्यास उशिर झाला. तेवढ्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात कमाल तापमानाची नोंद बघायला मिळाली. विदर्भात जून महिन्यातील 7 दिवस उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळाल्या. 

जून महिन्यात अनेक राज्यात उष्णतेच्या लाटा

प्रामुख्याने देशात एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळामुळे पावसाला उशीर झाला आहे. तर दुसरीकडे पूर्व भारतातील अनेक राज्यात उष्णतेच्या लाटांमध्ये अधिक दिवस काढावे लागल्याचं दिसत आहे.  जून महिन्यात पश्चिम बंगालमध्ये 17, ओडिशा, झारखंड आणि तेलंगाणात 14 दिवस उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळाल्या आहेत. तर सर्वाधिक बिहार राज्यात 19 दिवस उष्णतेची लाट बघायला मिळाली. 

 2 जुलै आणि 3 जुलैनंतर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 2 जुलै आणि 3 जुलैनंतर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यासोबतच संपूर्ण देशात जुलै महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात 

हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे. 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागात आणि संलग्न भागावर होण्याची शक्यता आहे. राज्यातही 4 आणि 5 जुलैला त्याचा प्रभाव असेल’, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर जून महिन्यात सरासरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. राज्यात अद्याप शेतांमध्ये पेरणी करण्याइतका पाऊस झालेला नाही. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : राज्यात पावसाला सुरुवात, मात्र शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

 

[ad_2]

Related posts