[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
शिंगाड्यामध्ये आढळणारे पोषक तत्व
शिंगाड्यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये वजन कमी करण्यासाठी उपयुक्त घटक अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेक एक्सपर्ट शिंगाडा पीठ खाण्याचा सल्लाही देतात. नवरात्री अथवा अनेक उपवासादरम्यान शिंगाडा पिठाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.
USDA डेटाबेसनुसार, शिंगाड्यामध्ये ४ ग्रॅम फायबर, २३.९ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, ३ ग्रॅम प्रोटीन आढळते. याशिवाय यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम, विटामिन ए आणि विटामिन सी चे प्रमाणही आढळते.
(वाचा – गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम)
शिंगाड्याच्या पिठाचा कसा वापर करावा
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर शिंगाड्याच्या पिठाचा नक्की कसा वापर करावा जाणून घेणे आवश्यक आहे. शिंगाडा पिठाचा अनेक पद्धतीने तुम्ही खाद्यपदार्थांमध्ये वापर करून घेऊ शकता.
शिंगाड्याच्या पिठाची चपाती, ढोकळा, पुरी तसंच शिंगाडा पिठाचे थालिपीठदेखील तुम्ही तयार करून आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. रोज गव्हाची चपाती खाण्यापेक्षा शिंगाडा पिठाची चपाती वजन कमी करण्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल.
(वाचा – युरिक अॅसिडची पातळी वाढली आहे कसे समजेल? काय कराल सोपा उपाय)
नाश्त्यात खाण्याचा सल्ला
अधिक एक्सपर्ट शिंगाडा पिठाचे पदार्थ हे नाश्त्यामध्ये खाण्याचा सल्ला देतात. शिंगाडा पिठाचे पदार्थ सकाळी खाल्ल्यास लवकर भूक लागत नाही. यातील फायबर लवकर भूक लागू देत नाही आणि यामुळे जास्त पदार्थ पोटात जात नाहीत आणि आपोआप वजन कमी होण्यास मदत मिळते.
(वाचा – पावसाळ्यात सकाळी उठताच प्या आयुर्वेदिक चहा, आजार राहतील दूर)
शिंगाड्याचे पिठाचे अन्य फायदे
- ज्या व्यक्तींना थायरॉईडशी संबंधित त्रास आहे, त्यांनी आपल्या रोजच्या आहारात शिंगाड्याचे पीठ समाविष्ट करून घेणे फायदेशीर ठरते. यातील विटामिन बी६, पोटॅशियम आणि आयोडिनचे प्रमाण थायरॉईडचा आजार बरा करण्यास उपयुक्त ठरते
- तुम्ही नाश्त्यामध्ये शिंगाड्याच्या पिठाच्या चपाती खाल्ल्यास दिवसभर एनर्जी चांगली राहाते आणि भूकही जास्त लागत नाही. त्यामुळे वजन कमी करताना थकवा जाणवत नाही
- शिंगाडा पिठामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असून सोडियमचे प्रमाण अत्यंत कमी असते, त्यामुळे ब्लड प्रेशरची वाढ होऊ देत नाही
संदर्भ
https://www.webmd.com/diet/health-benefits-water-chestnuts
[ad_2]