PM Modi Advocates Digital Payments For Transparency While Addressing The 17th Indian Co Operative Congress Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi AT ICC: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवार (1 जुलै) रोजी दिल्लीत 17 व्या भारतीय सहकारी महापरिषदेला (Indian Co-operative Congress) संबोधित केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये सहकार क्षेत्रात करण्यात आलेल्या बदलांविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी डिजिटल व्यवहारांचे देखील यावेळी कौतुक केले. त्यांनी म्हटलं की, ‘डिजिटल व्यवहारांमुळे पारदर्शकता निर्माण करण्यास मदत झाली आहे.’ तसेच त्यांनी रोख व्यवहार कमी करण्याचे आवाहन देखील यावेळी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज आपला देश विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. जेव्हा विकसित भारत बनवण्यासाठी मोठ्या उद्दिष्टांचा विचार केला गेला, तेव्हा आम्ही सहकार क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही पहिल्यांदा सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले.’

‘सहकार क्षेत्राला चांगल्या सुविधा उपलब्ध’ 

सहकार क्षेत्रांना उपलब्ध असलेल्या सुविधांविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ‘आज कॉर्पोरेट क्षेत्राला ज्या सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्याच सुविधा सहकारी संस्थांना देखील उपलब्ध करुन दिल्या जात आहे. सहकारी संस्थांची ताकद वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या करांचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले सहकार क्षेत्राचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यात आले आहे. तसचे सरकारने सहकारी बँका देखील मजबूत करण्याचे काम केले आहे.’ 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, ‘शेतकरी 2014 पूर्वी अनेकदा म्हणायचे की त्यांना  सरकारकडून फारच कमी मदत मिळते आणि  जी थोडीफार मदत मिळते ती मध्यस्थांच्या खात्यात जाते. देशातील अनेक शेतकरी सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. मात्र गेल्या 9 वर्षांत ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज अनेक शेतकऱ्यांना  पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे.’ 

‘शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2.5 कोटी रुपये जमा’

पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना म्हटलं की, ‘मागील चार वर्षांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत 2.5 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. तर केंद्र सरकराने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी दरवर्षी 6 लाख कोटी रुपये खर्च केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी  3 लाख 70 हजार कोटी रुपयांची तरतुद केल्याचं जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 315 रुपये प्रति क्विंटल ही किंमत देखील निश्चित करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : 

PM Modi Degress Issue: पंतप्रधानांच्या पदवी प्रकरणी केजरीवाल गुजरात उच्च न्यायालयात; 7 जुलै रोजी होणार सुनावणी

[ad_2]

Related posts