[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p> अजित पवार आले… सोबत आठ मंत्र्यांना मंत्री करुन गेले… पण गेल्या वर्षभरापासून मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गटातील नेत्यांना मात्र रडावं की हसावं हेच कळेना… याचं कारण अजित पवार गटाचे आठ नेते तुपाशी आणि वर्ष उलटलं… आत्ता मिळेल.. नंतर मिळेल अशा आशेवर बसलेले भाजप आणि शिंदे गटाचे नेते मात्र उपाशी राहिले… आणि म्हणूनच भाजप आणि शिंदे गटात नाराजी वाढलीए… शिंदे गटातील आमदारांनी नाराजी दूर करण्याचे एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत… शिंदेंच्या बैठका वाढल्यात.. ज्या मंत्र्यांनी आधी मंत्रिपदं भोगली त्यांची मंत्रिपदं आता इतरांना द्या अशी मागणी शिंदे गटात वाढू लागलीए.. तर अपक्ष आमदारांनीही नाराजी बोलून दाखवली… तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही भाजपतील नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्नात असल्याची माहिती मिळतेय… सत्तेतील नवीन समीकरणांमुळे बैठकांचं सत्र वाढलं.,…त्यामुळे आता दोन्ही पक्षातील आमदारांची नाराजी दूर होणार की महाराष्ट्राला आणखी काही पाहायला मिळणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल</p>
[ad_2]