While Having A Tea Avoid These 5 Mistakes It Cause Stomach Acid Reflux Gut Intestine Affected In Monsoon; पावसाळ्यात गरमागरम चहा पिताना या चुका करणं टाळा नाहीतर पोटात अॅसिड वाढून आतडे खराब होईल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जास्त चहा पिणे

जास्त चहा पिणे

सर्वात मोठी चूक तुम्ही करत असता ती म्हणजे खूप जास्त चहा पिणे. चहामध्ये टॅनिन असते जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराची लोह किंवा आयर्न शोषण्याची क्षमता कमी होते. यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊन शरीरातील रक्त आटून जाते. चहामध्ये असलेले कॅफिन शरीरातील पाणी काढून टाकते. म्हणून एका दिवसात दोन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नये.
(वाचा :- Fruits Bones: या 15 पदार्थांमुळे हाडांचा होतो भुगा, अंथरूणात खिळण्याआधी खा ही 5 फळं, लोखंडी रॉडसारखी होतील हाडं)​

मसालेदार चहा पिणे

मसालेदार चहा पिणे

चहा बनवताना अनेक जण आले, लवंग, दालचिनी, वेलची, तमालपत्र आणि जायफळ यांसारखे अनेक मसाले वापरतात. त्यांचा प्रभाव गरम असतो. या गरम मसाल्यांच्या अतिसेवनाने शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडू शकते.
(वाचा :- राहुल रॉयने Brain Stroke नंतर सोडून दिल्या या 2 घाणेरड्या सवयी, त्यातील एक गोष्ट 100% लोक आजही न चुकता करतात)​

रिकाम्या पोटी चहा पिणे

रिकाम्या पोटी चहा पिणे

बहुतेक लोकांचा दिवस काठोकाठ भरलेल्या चहा शिवाय सुरू होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया अर्थात मेटाबॉलिज्म मंदावते. यामुळे अपचन, सूज येणे, बद्धकोष्ठता आणि इतर अनेक आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
(वाचा :- 6 तासांत नसांमध्ये चिकटलेलं घाण कोलेस्ट्रॉल होतं गुल, हा उपाय करा नाहीतर ब्लॉकेजसाठी टाकावं लागेल हार्ट स्टेंट)​

चहा जास्त वेळ उकळवणे

चहा जास्त वेळ उकळवणे

मसाला चहा बनवताना तुम्ही अनेकदा लोकांना चहापत्ती वा चहा पावडर बराच वेळ उकळवताना पाहिलं असेल. जास्त वेळ चहा उकळवल्याने तो कडू आणि तुरट तर बनतोच पण त्यात कॅफीनचे प्रमाणही जास्त प्रमाणात निर्माण होते, ज्यामुळे असा चहा आरोग्यासाठी हानिकारक ठरतो.

(वाचा :- लग्न झालेल्या कपल्सना डॉक्टरचा इशारा, या 5 वाईट सवयी सोडा नाहीतर स्पर्म व आई-बाबा बनण्याचं स्वप्न कायमचं संपेल)​

जेवल्यानंतर लगेच चहा पिणे

जेवल्यानंतर लगेच चहा पिणे

अनेकांना ही एक वाईट सवय असते. जर तुम्ही देखील जेवल्यानंतर लगेच चहा पीत असाल तर ही स्वया सोडा. कारण चहाची पाने आम्लयुक्त असतात आणि पचन प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. याव्यतिरिक्त, टॅनिन शरीरात लोह आणि प्रथिने शोषण्यास देखील प्रतिबंधित करतात. त्यामुळे जेवणानंतर चहा घ्यायचा असेल तर किमान एक तासानंतर घ्या.
(वाचा :- 72000 नसांचे केंद्र असलेल्या या अवयवात तेल टाका, चुटकीसरशी गायब होईल गॅस व पोट साफ न होण्याची समस्या, उपाय वायरल)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts