ज्योती मौर्या प्रकरणात ट्विस्ट; अलोक मौर्याच्या अडचणीत वाढ, पत्नीनंतर आता वहिनीनेही केला गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jyoti Maurya Case: एसडीएम ज्योती मौर्य (Sdm Jyoti Maurya) आणि अलोक मौर्य (Alok Maurya) यांच्या प्रकरणाची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होती. अलोक मौर्य यांनी ज्योती यांच्यावर केलेल्या आरोपानुसार, अधिकारी झाल्यानंतर ज्योतीने त्याची फसवूणक केली. तसंच, ज्योतीचे विवाहबाह्य संबंध होते, असंही अलोकने म्हटलं आहे. अलोकने ज्योतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, एकीकडे ज्योतीनेही अलोकवर गंभीर आरोप केले आहेत. अलोक आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी छळत होते, असा आरोप तिने केला आहे. त्यातच आता अलोक मौर्याची वहिनी म्हणजेच भावाच्या बायकोनेही तक्रार दाखल केली आहे.

अलोक मौर्याची वहिनी शुभ्रा मोर्यने केलेल्या आरोपांनुसार तिच्या लग्नानंतर सासरची लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. पैशांसाठी ते तिला मारहाण करत होते. अनेकदा पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. गेल्या काही दिवसांपूर्वी शुभ्राने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गोष्ट उघड केली आहे. त्यानंतर प्रशासनाने पावलं उचलत केस दाखल केली आहे. 

शुभ्राच्या पतीचे नाव विनोद मौर्य असं आहे. दोघंही देवी नगर पट्टी प्रायागराज येथे राहतात. शुभ्राच्या आरोपांनुसार, लग्न ठरवताना पती विनोद मौर्या इंटेलिजेंस ब्युरोमध्ये अधिकारी आहेत, असं सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते जीएसटी विभागात स्टेनोग्राफर पदावर कार्यरत आहेत. त्यावेळेस खोटं बोलून लग्न करण्यात आलं होतं. लग्न करतानाही 5 लाख रुपयांची रक्कम आणि 5 लाखांचे दागिने आणि कार इतकं हुंड्यात देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही हुंड्यासाठी छळ आणि मारहाण होत होती. 

हुंडा बळी आणि मारहाण प्रकरणात शुभ्राने सासरे राम मुरारी मौर्य, सासू लीलावती मौर्य, दीर अशोक कुमार मौर्य, जाऊ प्रियांका मौर्य आणि छोटा दीर अलोक मौर्यविरोधात अनेकवेळा तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पती विनोद मौर्य अनेकदा मोठी गाडी आणि हिऱ्याची अंगठी, सोने चांदीचे दागिनेसाठी दबाव आणत होता, असं तिने म्हटलं आहे. 

शुभ्राच्या आरोपांनुसार मुलगी झाल्यानंतर सासु-सासरे टोमणे मारायचे. तसंच, मुलीचाही जीव घ्यायचा प्रयत्न केला. त्याची खूण आजही मुलीच्या कपाळावर आहे. 

आलोक मौर्यावर दोन एफआयआर

ज्योतीनेही अलोक मौर्या आणि सासरच्या लोकांवर एफआयआर दाखल केली आहे. हुंड्यासाठी छळ आणि मारहाण करत असल्याचं तिने तक्रारीत नमूद केलं आहे. हे प्रकरण कोर्टात असतानाच आता अलोकच्या वहिनीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं अलोकच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Related posts