[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अधिक माहितीनुसार, सीमाने सांगितलं की, जेव्हा ती PUBG गेम खेळायची तेव्हा तिची ओळख उघड होऊ नये म्हणून तिने वेगळ्या नावाने तिचा आयडी बनवला होता आणि ते नाव मरियम खान असं होतं. कारण, सीमाने असा दावा केला आहे की, पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे ओळख पटल्यानंतर वाईट वागणूक मिळू शकते. या भीतीमुळे तिने असं केलं.
यूपी एटीएसच्या चौकशीत सीमाने पुढे सांगितले की, मरियम खान म्हणून आयडी वापरण्याचा तिच्या काही ओळखीच्या लोकांनी तिला सल्ला दिला होता. ती रात्री ९ नंतर उशिरापर्यंत PUBG गेम खेळायची. त्यानंतर एकदा पबजी खेळत असताना तिची ओळख सचिनशी झाली. सुरुवातीला सचिनलाही मरियम खान नावाच्या आयडीने आकर्षित केलं होतं. त्यानंतर दोघांनी PUBG गेममध्ये एकत्र सहभाग घेतला आणि त्यानंतर हा गेम खेळत असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही.
अद्याप सीमाविरुद्ध हेरगिरीचे पुरावे मिळालेले नाहीत…
आतापर्यंतच्या तपासात असं समोर आलं आहे कीी तपास यंत्रणा आणखी एका नावाचा आयडीही तपासत आहेत, जेणेकरून तपास पुढे चालू शकेल. दुसरीकडे, यूपी पोलीस सीमा हैदरच्या विरोधात हेरगिरीचा कोणताही पुरावा नसल्याची माहिती देत आहेत. परंतु, तपासाची व्याप्ती सीमा आणि सचिनभोवतीच आहे. यूपी एटीएसचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र, सीमा हैदर हिला अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. तर यूपी एटीएसने आपला अहवाल यूपीच्या गृह विभागाला सादर केला आहे.
[ad_2]