Ramdas Athawale On Pakistani National Seema Haider No Question Of Including Her In Republican Party Of India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Seema Haider News: पाकिस्तानी (Pakistan) महिला सीमा हैदर (Seema Haider) आणि ग्रेटर नोएडाचा सचिन मीणा (Sachin Meena) सध्या चर्चेत आहेत. कधी दोघांना चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत, तर कधी कोणीतरी नोकरीच्या ऑफर पाठवत आहे. अशातच सीमा हैदर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमा हैदर पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, आता याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचं स्पष्टीकरण समोर आलं आहे.

पाकिस्तानी नागरिक असलेल्या सीमा हैदरबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, “आमच्या पक्षाचा सीमा हैदरशी कोणताही संबंध नाही. त्या पाकिस्तानातून भारतात आल्या आहेत. त्यांचा पक्षात समावेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि जर त्यांना तिकीट द्यायचंच असेल तर ते भारतातून पाकिस्तानचे तिकीट असेल.”

पक्षाचे प्रवक्ते किशोर मासूम काय म्हणाले होते? 

याआधी पक्षाचे प्रवक्ते किशोर मासूम म्हणाले होते की, “सीमा यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षा बनवल्या जाऊ शकतात. सीमा निर्दोष असल्याचं आढळल्यास, त्यांचा गुप्तहेर असल्याचा कोणताही पुरावा न सापडल्यास आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाल्यास त्यांचा पक्षात समावेश केला जाईल.”

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरनं आता ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावात राहायला सुरुवात केली आहे. सीमा आणि सचिन दोघेही पोलिसांच्या निगराणीत असून सचिन सध्या कोणतंही काम करत नाही. या जोडप्याच्या दुरावस्थेच्या आणि गरिबीच्या कहाण्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सीमाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती आपल्या पतीच्या नोकरीबाबत आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे.

सीमा हैदरची चौकशी सुरू

पाकिस्तानी महिला सीमा हैदरची भारताच्या नोएडा येथील सचिनबरोबर पब्जी खेळत असताना मैत्री झाली. प्रियकराला भेटण्यासाठी सीमा हैदरने चार मुलांसह नेपाळमधून अनधिकृतपणे भारतात प्रवेश केला. सीमाकडे संशयास्पद चार पासपोर्ट आणि मोबाईल आढळल्याने एटीएसने सीमाची तब्बल आठ तास चौकशी केली. सीमाने कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. चार मुलांची आई असलेल्या सीमाला पब्जी खेळण्यास वेळ कसा मिळाला?  अवगत तंत्रज्ञान तिला कसं माहित? याबद्दल सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत.

[ad_2]

Related posts