G20 Summit S Jaishankar Reaction On Russian President Putin And Chinese President Xi Jinping Skipping G20

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

S Jaishankar On China-Russia: राजधानी दिल्लीत आयोजीत करण्यात आलेल्या जी 20 (G-20 Summit) परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जी 20 परिषदेसाठी जगभरातील नेते  भारतभेटीवर येणार आहे. दरम्यन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन सहभागी होणार नाहीत. यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भाष्य केले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, अनेकदा काही अपरिहार्य कारणांमुळे नेत्यांना उपस्थित राहता येत नाही. परंतु  त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते आपले प्रतिनिधी पाठवतात.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर  म्हणाले,  जी 20 परिषदेमध्ये अनेकदा देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहणे शक्य होत नाही. या प्रसंगी ते आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना पाठवतात. आपल्या प्रतिनिधींमार्फत ते आपल्या देशाला मांडतात. मला वाटते प्रत्येक व्यक्ती गंभीरपणे सहभागी होत आहे. 

परिषदेसाठी कोण येत आहे? कोण येणार नाही? यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक देश परिषदेच्या माध्यमातून आपल्या देशाला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटते की जी 20 परिषदेतून काय हाती लागते, कोणत्या विषयावर चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे असणार अशी प्रतिक्रिया  एस. जयशंकर यांनी दिली आहे. 

या अगोदर दूरदर्शनशी बोलताना एस. जयशंकर म्हणाले, देशाचे प्रतिनिधित्व तीच व्यक्ती करते ज्या व्यक्तीला लोकांना निवडून दिले आहे. जी 20 परिषदेतील काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतात होणाऱ्या जी 20 परिषदेत होणाऱ्या निर्णयांसाठी कायम लक्षात राहणार आहे.  

परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिल्ली नगरी सज्ज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्तानं पहिल्यांदाच भारतभेटीवर येणार आहेत . जी 20 परिषदेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. थोडक्यात परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिल्ली नगरी सज्ज झाली आहे.

हे ही वाचा:

G20 Summit 2023 : G20 परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडन पहिल्यांदाच करणार भारत दौरा; ‘या’ मुद्द्यावर करणार पंतप्रधान मोदींशी चर्चा



[ad_2]

Related posts