Pune Visarjan : पुण्यातील वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाटात गणपती विसर्जनासाठी प्रशासनाकडून तयारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पहिले मानाचे पाच गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तर अखिल मंडई, राजराम मंडळ, भाऊ रंगारी आणि बाबू गेनू मंडळं संध्याकाळी ७.३० नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. त्यामुळे गेली अनेक वर्षे सुरु असलेला विसर्जन मिरवणुकीचा क्रम बदलणार आहे. गेली काही वर्षे विसर्जन मिरवणुक लांबत चालल्यान् काही मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मध्यरात्र उलटून जाते. मागील वर्षी तर दगडूशेठ हलवाई गणपतीला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास दुसरा दिवस उजाडला होता. काही मंडळांनी अलका चौकात जास्त वेळ ठाण मांडल्यानं रांगेत पाठीमागे असलेल्या गणेश मंडळांमधे असंतोष वाढत जाऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ती टाळण्यासाठी पोलिसांना गणेश मंडळांकडून शिस्तीचं पालन होईल याची खबरदारी लागणार आहे.</p>

[ad_2]

Related posts