Gold Prices Will Fall Before Diwali Read In Detail 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gold Rate : सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी घसरण होणार आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे. जुलै महिन्यात सोन्याचे दर हे 60,499 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचले होते. आज जर विचार केला तर सोन्याचे दर हे 58 हजार 139 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचे दर हे 2 हजार 500 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. 

गेल्या दोन महिन्यांत सोन्याचा दर हे 2400 रुपयांनी कमी झाला आहे. त्यानंतर देशात सोन्याचा दर सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. डॉलरच्या निर्देशांकातील वाढ आणि रोखे उत्पन्नात वाढ हे त्याचे कारण आहे. येत्या काही दिवसांत किंवा दिवाळीपूर्वी सोने आणखी म्हणजे 2 हजार 500 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. देशात सोन्याचा भाव 55 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतरही सोन्याचा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 10 टक्क्यांनी अधिक असेल. 

सोने सहा महिन्यांच्या निचांकी पातळीवर

सध्या सोन्याच्या भावाने सहा महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर फ्युचर्स 123 रुपयांच्या घसरणीसह 58160 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान तो 58 हजार 139 रुपये प्रति दहा ग्रॅम या सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. गेल्या दोन महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर सोन्याच्या दरात सुमारे 2 हजार 400 रुपयांची घसरण दिसून आली आहे. 27 जुलै रोजी सोन्याचा भाव 60 हजार 499 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला होता. त्यानंतर आज सोन्याचा भाव हा 58 हजार 139 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

चांदीच्या दरातही घसरण 

दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, दुपारी 12:30 वाजता चांदीचा भाव 52 रुपयांच्या किंचित घसरणीसह 70 हजार 497 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान तो 70 हजार 457 रुपये प्रति किलोवर पोहोचला. गेल्या दोन महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर 27 जुलै रोजी चांदीचा भाव 77 हजार 611 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच आजच्या खालच्या पातळीच्या तुलनेत चांदी 7 हजार 154 रुपयांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. 

सोने स्वस्त होण्याचे कारण काय?

सोने स्वस्त होण्याचे प्रमुख कारण म्हणजे डॉलर निर्देशांकातील वाढ. आकडेवारीनुसार, सध्या डॉलर निर्देशांक 106.70 वर व्यवहार करत आहे. जो गेल्या काही आठवड्यात 102 ते 103 डॉलरवर होता. तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या निर्देशांकात वाढ झाल्याने सोन्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. ही घसरण येत्या काही दिवसांतही सुरू राहू शकते.

सोने 2500 रुपयांनी स्वस्त होऊ शकते

दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. याचे कारण डॉलर निर्देशांकात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत FOMC व्याजदरात 25 आधार अंकांनी वाढ करू शकते. त्याचा परिणाम डॉलर निर्देशांकावर दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते, जर डॉलरचा निर्देशांक 110 च्या पातळीवर पोहोचला, तर धनत्रयोदशीपर्यंत भारतातील सोन्याचा भाव सध्याच्या पातळीपेक्षा 2500 रुपयांनी कमी होऊ शकतो. याचा अर्थ सोन्याचा भाव 55,500 रुपयांपर्यंत येऊ शकतो.

 

[ad_2]

Related posts