[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rohit Sharma On Shubman Gill: रविवारी भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान असणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाची सामन्यासाठीची तयारी आणि शुभमन गिलच्या फिटनेसवर प्रतिक्रिया दिली आहे.
कॅप्टन शर्माने व्यक्त केला विश्वास
भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, आमच्या संघातील खेळाडूंचा पूर्ण तयारी झाली आहे, सर्व उत्कृष्ट खेळत आहेत. आमच्या खेळाडूंमध्ये सध्या आत्मविश्वास आहे, ते नक्कीच यशस्वी कामगिरी करतील.
शुभमन गिल सध्या खेळण्यासाठी फिट नाही
याशिवाय रोहित शर्माने शुभमन गिलच्या फिटनेसवर आपली प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा म्हणाला की, शुभमन गिल खेळण्यासाठी 100 टक्के फिट नाही. खरं तर शुभमन गिल सध्या थोडा आजारी आहे, पण याचा अर्थ तो येत्या सामन्यांमध्ये खेळणारच नाही, असं नाही. शुभमन गिलच्या फिटनेसवर आमचं लक्ष आहे.
वास्तविक, शुभमन गिलचं आजारी पडणं भारतीय संघाच्या व्यवस्थापनासाठी अडचणीचं ठरलं आहे. सध्या शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे. आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलिया मालिकेत शुभमन गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली. पण आता वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचा सध्याचा उत्कृष्ट खेळाडू शुभमन गिल डेंग्यूने ग्रस्त आहे.
रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबर रोजी चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. यानंतर भारतीय संघासमोर अफगाणिस्तानचं आव्हान असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानशी भिडणार आहे.
वनडे फॉर्मेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड
भारतामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत 70 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 33 सामन्यात विजय मिळवला आहे. पाच सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया आणि कांगारु यांच्यामध्ये आतापर्यंत 54 सामने झाले आहेत, त्यामध्ये भारतीय संघाला फक्त 14 सामन्यात विजय मिळला आहे, तर ऑस्ट्रेलियाने 38 सामन्यात बाजी मारली आहे. दोन सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही. मायभूमीतही ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.
हेही वाचा:
IND vs AUS : भारतापुढे कांगारुचे खडतर आव्हान, पाहा हेड टू हेड आकडेवारी
[ad_2]