[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vande Bharat: देशातील 19वी वंदे भारत एक्सप्रेस मडगाव-मुंबई (Madgaon-Mumbai Vande Bharat) मार्गावर सुरू होणार आहे. मात्र तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Modi) स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. कारण, 15 ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं मोदींनी जाहीर केलं होतं. मात्र सध्याचा वंदे भारत ट्रेन बनवण्याचा वेग पाहता केवळ 10 ते 12 ट्रेनच ऑगस्टपर्यंत बनतील, त्यादेखील केवळ 8 डब्यांच्या, असं चित्र सध्या निर्णाण झालं आहे. त्यामुळे मोदींचं स्वप्न अपूर्ण राहण्याची दाट शक्यता आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2019 ला नवी दिल्ली स्थानकात हिरवा झेंडा दाखवून पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला लोकार्पित केलं आणि भारतीय रेल्वेचं नवं पर्व सुरू झालं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं मोदींनी गेल्या वर्षी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून जाहीर केलं.
मात्र, नरेंद्र मोदींचं हे स्वप्न अपूर्ण राहण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण देखील तसंच आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदींनी एका वर्षात 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचं आव्हान भारतीय रेल्वेला दिलं, त्यावेळी भारतीय रेल्वेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक रेल्वे निर्मिती करण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती.
वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवण्यात येतात. सध्या तिथे उत्पादनाची पूर्ण क्षमता लावून 16 डब्यांच्या महिन्याला केवळ 4 वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येत आहेत. अशा प्रकरच्या एकूण 18 वंदे भारत एक्सप्रेस आतापर्यंत बनवण्यात आल्या आहेत. जी 19वी वंदे भारत एक्सप्रेस मडगाव आणि मुंबईच्या दरम्यान धावेल, ती तर केवळ आठ डब्यांचीच आहे.
Reels
जुलै महिन्यात लातूर कोच फॅक्टरीमधून वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती सुरू करण्याचा प्लॅन आहे. मात्र तिथे देखील महिन्याला 4 ते 5 वंदे भारत एक्सप्रेस बनतील. त्यामुळे चेन्नई आयसीएफ येथील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातल्या 8 ते 10 आणि लातूर कोच फॅक्टरी येथील जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील 8 ते 10 वंदे भारत एक्सप्रेस येत्या काळात बनून तयार होतील, मात्र त्यामुळे नरेंद्र मोदींचं टार्गेट पूर्ण होणार नाही.
दुसरीकडे, याच वंदे भारत एक्सप्रेसचे दुसरे स्लीपर कोच असलेले व्हर्जन निर्माण करण्यासाठी रशियाच्या टीएमएच (TMH) आणि भारतातील रेल विकास निगम लिमिटेड या दोन कंपन्यांच्या जॉईंट व्हेंचरला कंत्राट देण्यात आलं होतं. तब्बल 30 हजार कोटींपेक्षा जास्तीच्या या कंत्राटात 120 स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येणार होत्या. मात्र, रशिया आणि युक्रेन देशातील युद्धामुळे जगाने रशियावर टाकलेल्या वेगवेगळ्या निर्बंधांमुळे ही योजना देखील संकटात सापडली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस या खरं तर 16 डब्यांच्या बनवण्याचा प्लॅन होता. मात्र टार्गेट पूर्ण होत नाही हे लक्षात येताच आता 8 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कमी डब्यांच्या एक्सप्रेसमुळे प्रवासी वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या भारतीय रेल्वेमध्ये राजधानी एक्सप्रेसपेक्षा जास्त प्रायोरिटी ही वंदे भारत एक्सप्रेसला देण्यात येत आहे. त्यासाठी इतर गाड्यांचे वेळापत्रक देखील अनेक वेळा बदलण्यात आले आहे. मात्र ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणी देखील वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा अट्टाहास का केला जातोय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा:
Vande Bharat Express: मुंबई-गोवा प्रवास आता हायस्पीड; कोकण मार्गावर 5 जूनपासून धावणार ‘वंदे भारत’ ट्रेन
[ad_2]