[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : राज्याच्या गृहखात्यावर ढीगभर प्रश्न आणि सर्वच व्यवस्थेवर (Sasoon Hospital Drug Racket) भलामोठा ठपका ठेवणारा ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलीसांनी अटक केली. पण ललित पाटील प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यात आता एक मोठी माहिती समोर आली. ड्रग्स माफिया ललित पाटील याचं आंतरराज्यात मोठं साम्राज्य होतं आणि तो आता पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचा प्रयत्न होता. त्याच्या कॉल रेकॉर्डवरुन अनेक खुलासे झाले आहेत.
ललित अनिल पाटील सध्या ड्रग्स प्रकरणावरून चर्चेत असलेला राज्यातील एक मोठा ड्रग्स माफिया आहे ललित पाटील हा सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे. 2020 पासून ललित पाटील हा ड्रग्स व्यवसायात आहे. एक साधा वाईन कंपनीत आणि शेळी पालनचा व्यवसाय करणाऱ्या ललिने गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आपला ड्रग्जचा काळा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला होता अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत आतापर्यंत समोर आली आहे.
ड्रग्स माफिया ललित पाटीलचा आंतरराज्य कनेक्शन कुठपर्यंत?
नाशिकमध्ये ड्रग्स बनवणारा ललित पाटील हा महाराष्ट्रातून इतर सप्लाय करत होता. हे ड्रग्ज महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तर काही भागांमध्ये जात होते. ललित पाटील याचे कनेक्शन फक्त इथवर न थांबता दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटक,आंध्रप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यात देखील पसरले होते.
ललित पाटील याला नाशिकमधील फॅक्टरी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. मात्र ललित पाटीलचं हे ड्रग्जच साम्राज्य फक्त आंतरराज्या पुरतंच मर्यादित नव्हतं तर तो देशाबाहेर देखील पसरवण्याच्या तयारीत होता, ही माहिती देखील त्याच्यात तपासात समोर आली आहे.
ललित पाटीलचा पुढचा प्लॅन काय होता?
नाशिकमधून बनवणारे ड्रग्स आंतरराज्यात ज्याप्रमाणे सप्लाय केले जातात. त्याप्रमाणे आणखी एक फॅक्टरी उभारून आंतरराष्ट्रीय पातळीवर लागणारे ड्रग्ज तो बनवण्याच्या तयारीत होता. त्यासाठी लागणारे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ड्रग्स माफी यांचे कनेक्शन देखील त्यांनी मिळवले होते. नवीन फॅक्टरीसाठी लागणारी जागा तो मराठवाड्यात सोलापूर, लातूर या परिसरामध्ये शोधत होता. महत्त्वाचं म्हणजे एमआयडीसी सारखी जागा तो घेण्याचा प्रयत्न होता.
आतापर्यंतच्या चौकशीत ललित हा आंतरराज्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्सचा विस्तार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांच्या संपर्कात होता, अशी माहिती त्याच्या कॉल रेकॉर्डिंग वरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हाय प्रोफाइल ड्रग्स बनवून तो इंटरनॅशनल ड्रग्स बनवण्याचा प्रयत्न करणार होता, अशी देखील माहिती पोलिसांना आतापर्यंत त्याच्या चौकशी मिळाली आहे.
गुन्हेगारी आणि राजकारण यांना एकत्र सांधत ललित पाटीलने आपलं ड्रग्जचं साम्राज्य उभं केलं पण खरी चिंता ही आहे की ड्रग्जसारख्या गंभीर विषयावरसुद्धा आपली पोलीस व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था गंभीर नाही. ललित पाटीलने अटक झाल्यावर केलेलं वक्तव्य त्याचंच द्योतक आहे. ललित पाटीलचा सगळा प्रवास हा फक्त त्याच्या कुटुंबियांसाठीच नाही तर व्यवस्था आणि समाजासाठीही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
इतर महत्वाची बातमी-
Lalit Patil drug Case : ललितला 2020 मध्ये अटक, मात्र ठाकरेंनी त्याला प्रमुख केलं, त्याची चौकशी का नाही केली?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
[ad_2]