Muslims Get Citizenship In This Neighboring Country Of India This Is Not Pakistan All About Maldives

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World News: जेव्हाही कधी आपण भारताच्या (India) शेजारील कोणत्याही मुस्लिम देशाबद्दल (Muslim Countries) बोलतो, तेव्हा आपल्या मनात पहिलं नाव येतं ते म्हणजे पाकिस्तान (Pakistan). पण आता आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत, तो पाकिस्तान नसून दुसरा एक देश आहे. हा देश पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे.

तर फक्त मुस्लिमांनाच नागरिकत्व देणारा देश म्हणजे- मालदीव. मालदीव (Maldives) हा आशियातील सर्वात लहान देश असून त्याचं क्षेत्रफळ सुमारे 298 चौरस किलोमीटर आहे. तुम्हाला हे जाणूनही आश्चर्य वाटेल की या देशात केवळ काही लाख लोक राहतात.

या देशाची एकूण लोकसंख्या किती?

मालदीवच्या लोकसंख्येबद्दल बोलायचं झालं तर, 2016 च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे 4 लाख 28 हजार होती. पण 2021 मध्ये इथली लोकसंख्या 5.21 लाख झाली. मालदीवमध्ये सुमारे 212 बेटं आहेत, त्यापैकी सुमारे 200 बेटांवर स्थानिक लोक राहतात आणि 12 बेटं पर्यटकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

इथे भारतीय कसे जाऊ शकतात?

भारतीयांना मालदीवमध्ये जायचं असेल तर त्यांना व्हिसाची गरज नाही. वास्तविक, मालदीवमध्ये जाणाऱ्यांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही इथल्या विमानतळावर उतरताच तुम्हाला 30 ते 90 दिवसांचा व्हिसा कोणत्याही अडचणीशिवाय मिळेल. तुमच्याकडे फक्त वैध पासपोर्ट (Valid Passport) आणि मालदीवमधील हॉटेलमध्ये बुकिंग (Hotel Booking) असल्याचा पुरावा असणं आवश्यक आहे.

मुस्लिम धर्माशी संबंधित काय आहे कायदा?

मालदीवच्या संविधानात असं म्हटलं आहे की, केवळ तेच लोक मालदीवचे नागरिक बनू शकतात जे इस्लामला मानतात, म्हणजेच जे मुस्लिम आहेत. अगदी मालदीवच्या 2008 च्या संविधानात देखील सुन्नी इस्लाम हा इथला राज्य धर्म असेल असं म्हटलं आहे. कोणत्याही गैरमुस्लिम व्यक्तीला या देशाचं नागरिकत्व देता येणार नाही, असंही या घटनेत नमूद करण्यात आलं आहे. मालदीवमधील सरकारी नियम देखील इस्लामिक कायद्यावर आधारित आहेत.

सुंदर बेटं आणि चौपाट्या

मालदीवमध्ये 64 सुंदर समुद्राच्या दृश्यांसह व्हिलासाठी पर्याय मिळतात. अनेक ठिकाणी तुम्हाला स्थानिक आयुर्वेदिक स्पामध्ये मालिशचा पर्याय उपलब्ध होतो. अतिशय सुंदर मालदीव हे जगातील अतिशय सुंदर बेटांपैकी एक बेट आहे. हनीमून जोडीपासून ते सोलो ट्रिप, फॅमिली ट्रिप किंवा ग्रुप ट्रिपपर्यंत ही जागा कोणालाही निराश करत नाही. येथील निळ्याशार पाण्यामुळे ही जागा जास्त प्रचलित आहे.

हेही वाचा:

Crime: पाठीचा कणा मोडला, डोकं रक्तबंबाळ केलं; 10 वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर जल्लाद प्रियकराने प्रेयसीला संपवलं

[ad_2]

Related posts